औरंगाबाद महापालिकेचा स्वतंत्र हवामान विभाग, पुढील 30 वर्षांचा हवामान आराखडा आखणार, जागतिक संस्थेशी करार

औरंगाबाद महापालिकेअंतर्गत आता स्वतंत्र हवामान विभाग उभारला जाणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. विशेष म्हणजे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात विभागाचे उद्घाटन होण्याचीही शक्यता आहे.

औरंगाबाद महापालिकेचा स्वतंत्र हवामान विभाग, पुढील 30 वर्षांचा हवामान आराखडा आखणार, जागतिक संस्थेशी करार
करारावर स्वाक्षरी करताना महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 12:45 PM

औरंगबादः महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या (Aurangabad smart city) वतीने शहराचा हवामान कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात हवामान बदलाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांचा समावेश असेल. बुधवारी या अनुशंगाने वर्ल्ड रिसोर्सेस इस्टिट्यूट (WRI) या संस्थेशी महानगरपालिकेने करार केला. या संस्थेच्या प्रतिनिधींशी महापालिका प्रशासक आणि स्मार्ट सिटीची सीईओ आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी ऑनलाइन पद्धतीने चर्चा केली. त्यानंतर या महाराष्ट्र शासन व चिल्ड्रेन इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन यांच्या सहकार्याना सदर करार करण्यात आला.

महापालिका उभारणार स्वतंत्र हवामान विभाग

या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर प्रशासक आस्तिक कुमार पांडेय म्हणाले, महानगरपालिकेत आता स्वतंत्र हवामान विभाग उभारला जाणार आहे. या विभागाची जबाबदारी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे राहील. तसेच या विभागाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात होणार आहे.

हवामान बदलासाठी शहराला तयार करणार

मनपा प्रशासक आणि WRI संस्थेच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी ऑनलाइन बैठक झाली. यावेळी संस्थेच्या लुबैना रंगवला यांना प्रशासकांनी सांगितले की, ‘अतिवृष्टी, वाढीव तापमान, दुष्काळ, ढगफुटी हे सर्व हवामान बदलाचे दुष्परिणाम आहेत. त्याला आळा घालण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही हवामान कृती आराखडा तयार करू इच्छितो.’ संस्थेशी झालेल्या करारानुसार महापालिकेला 2023 पर्यंत पाच टप्प्यांत 30 वर्षांचा कृती आराखडा तयार करून दिला जाईल. तसेच शहराच्या हवामान कृती आराखड्याचे दोन मुख्य भाग आहेत. प्रदूषण कमी करणे आणि नागरिकांना हवामान बदलासाठी तयार करणे. WRI औरंगाबादला केंद्र शासनाच्या क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्कमध्ये काम करण्यासाठी सहकार्य करेल.

इतर बातम्या-

धर्मेंद्रंना सोशल मीडियावर मागावी लागली चाहत्यांची माफी! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Sarsenapati Hambirrao | ‘केलेल्या कामाचं चीज झालं!’, ‘बाहुबली’ प्रभासकडून प्रवीण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’चं कौतुक!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.