ZP Elections| औरंगाबाद जिल्हा परिषदांच्या प्रारुप आराखड्याची तपासणी, गट, गण वाढीवर चर्चांना उधाण!

औरंगाबाद, सिल्लोड तालुक्यात प्रत्येकी 2 तर फुलंब्री, पैठण, वैजापूरमध्ये प्रत्येकी एक गट वाढेल. तसेच कन्नड किंवा खुलताबाद तालुक्यात एक गट वाढेल. जिल्हा परिषदेच्या एका गटात पंचायत समितीचे दोन गण असतात. त्यामुळे ज्या तालुक्यात गट वाढतील, तिथे गणांची संख्याही वाढेल.

ZP Elections| औरंगाबाद जिल्हा परिषदांच्या प्रारुप आराखड्याची तपासणी, गट, गण वाढीवर चर्चांना उधाण!
औरंगाबाद जिल्हा परिषद
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 3:00 AM

औरंगाबादः जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या (Aurangabad ZP Election) पार्श्वभूमीवर गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या फेररचनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) केलेल्या सूचनेनुसार, वाढील लोकसंख्या लक्षात घेता औरंगाबाद जिल्हा परिषदेचे 8 गट आणि पंचायत समितीचे 16 गण वाढणार आहेत. राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या आणि 284 पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti) सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयारी सुरु आहे. या निवडणुकांसाठी तयार केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या आराखड्याची तपासणी सध्या राज्य निवडणूक आयोगाकडून सुरु झाली आहे. 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान ही तपासणी होईल.

12 फेब्रुवारी रोजी औरंगाबादची तपासणी

राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या प्रारुप प्रभाग आराखड्याच्या तपासणीचा वार आणि तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार, औरंगाबाद जिल्ह्याचा आराखडा 12 फेब्रुवारी तपासण्यात येईल. हा आराखडा पाठवताना कोणत्या बाबींचा विचार केला गेला, त्यासाठी आधार घेतलेली कागदपत्रे, नकाशे आदीही सोबत आणण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

गट आणि गणांत बदल कसे ?

औरंगाबादेत विद्यमान जिल्हा परिषदेत 62 गट तर पंचायत समित्यांचे एकूण 124 गण आहेत. राज्य शासनाच्या सदस्यसंख्या वाढीच्या निर्णयाला राज्यपालांनीही मंजुरी दिली आहे. गट आणि गणांची रचना करताना 10 टक्के वाढीव लोकसंख्या विचारात घेतली जाईल. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषदेत 8 गण व पंचायत समित्यांचे 16 गण वाढतील. निवडणुकीपूर्वी गटांची संख्या 70 आणि गणांची संख्या 136 होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

कोणत्या तालुक्यात किती गण वाढणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, सिल्लोड तालुक्यात प्रत्येकी 2 तर फुलंब्री, पैठण, वैजापूरमध्ये प्रत्येकी एक गट वाढेल. तसेच कन्नड किंवा खुलताबाद तालुक्यात एक गट वाढेल. जिल्हा परिषदेच्या एका गटात पंचायत समितीचे दोन गण असतात. त्यामुळे ज्या तालुक्यात गट वाढतील, तिथे गणांची संख्याही वाढेल. नव्या गट रचनेमुळे गावांची संख्या कमी होईल. पूर्वी एका गटात 23 ते 25 गावांचा समावेश होता. आता गटाच्या रचनेनंतर एका गटातील गावांची संख्या 21 ते 23 पर्यंत होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर बातम्या-

‘अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’, नाना पटोलेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर

Nashik | महापालिकेच्या अर्थसंकल्पात नाशिककरांना काय मिळाला मोठा दिलासा; कोणत्या योजनांसाठी किती कोटी?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.