Lonikar Audio Clip : लोणीकरांच्या ऑडीओ क्लिपचे मुंबई ते औरंगाबाद पडसाद, काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोणीकरांच्या घरावर शेण फेकलं

| Updated on: Mar 31, 2022 | 6:39 PM

भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या घरावर शेण फेकण्यात आलं आहे. बबनराव लोणीकर यांच्या ऑडिओ क्लिपचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. बबनराव लोणीकर यांच्या औरंगाबादमधील सातारा परिसरातील घरावर शेण टाकण्यात आलं आहे.

Lonikar Audio Clip : लोणीकरांच्या ऑडीओ क्लिपचे मुंबई ते औरंगाबाद पडसाद, काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोणीकरांच्या घरावर शेण फेकलं
बबनराव लोणीकर यांच्या घरावर शेण फेकलं
Image Credit source: Tv9
Follow us on

औरंगाबाद: भाजप नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या घरावर शेण फेकण्यात आलं आहे. बबनराव लोणीकर यांच्या ऑडिओ क्लिपचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. बबनराव लोणीकर यांच्या औरंगाबादमधील (Aurangabad) सातारा परिसरातील घरावर शेण टाकण्यात आलं आहे. घराला शेण फासण्यात आलं आहे. बबनराव लोणीकर यांनी आयटीची धाड टाकण्याचं आणि दलित समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. याच्या विरोधात काँगेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी शेण फेकलं आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. बबनराव लोणीकर यांच्यासंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती. त्याचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील उमटले आहेत.

बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाईची मागणी

बबनराव लोणीकर  यांच्या ऑडिओ क्लिपवरुन मंत्रिमंडळात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बबनराव लोणीकर यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी काही मंत्र्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय दोन तरुणांनी बबनराव लोणीकर यांच्या विरोधात अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोणीकरांच्या घरावर शेण फेकलं

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बबनराव लोणीकर यांच्या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपवर संताप व्यक्त केला आहे. बबनराव लोणीकर यांनी व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये वीज बिलाच्या मुद्यावरुन वीज अभियंत्याला दम भरला होता. यासंदर्भातील प्रकरण चांगलंच तापलं आहे. काल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बबनराव लोणीकर यांच्यावर करावाई करण्याचे आदेश दिले होते. आज काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

पाहा व्हिडीओ :

गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड यांच्याकडून अट्रॉसिटीची तक्रार

बबनराव लोणीकर  यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बबनराव लोणीकर यांच्याविरोधात अॅट्रोसिटीची  तक्रार  दाखल झाली आहे. औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयात अॅट्रोसिटीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड या दोन कार्यकर्त्यांनी अट्रासिटीची तक्रार दिली आहे. दलित समाजाचा अपमान केल्यामुळे अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, बबनराव लोणीकर यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार ही चौकशी सुरू झाली आहे. एका अभियंत्याला शिवीगाळ करताना आक्षेपार्ह शब्द वापरले होते, असा दलित कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यानुसार तक्रारही दाखल झाली आहे.

इतर बातम्या:

Aurangabad : बबनराव लोणीकरांच्या अडचणी वाढणार, अट्रॉसिटीची तक्रार दाखल

Lonikar Audio Clip : बबनराव लोणीकरांचा पाय खोलात? ऑडिओ क्लिप प्रकरणात चौकशी सुरु, अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल!