Lonikar Audio Clip : बबनराव लोणीकरांचा पाय खोलात? ऑडिओ क्लिप प्रकरणात चौकशी सुरु, अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल!

Lonikar Audio Clip : बबनराव लोणीकरांचा पाय खोलात? ऑडिओ क्लिप प्रकरणात चौकशी सुरु, अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल!
बबनराव लोणीकर, आमदार, भाजप
Image Credit source: TV9

लोणीकर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादेतील गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड या दोघांनी औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दत्ता कानवटे

| Edited By: सागर जोशी

Mar 31, 2022 | 12:25 PM

औरंगाबाद : माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, बबनराव लोणीकर यांच्या कथित ऑडिओ क्लिप (Audio Clip) प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. लोणीकर यांनी एका वीज अभियंत्याला शिविगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार आता या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदवले यांनी यांनी दिली आहे. इतकंच नाही तर लोणीकर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीची (Atrocity) तक्रारही दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादेतील गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड या दोघांनी औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दलित समाजाचा अपमान केल्यामुळे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.

नितीन राऊतांचे चौकशीचे आदेश

बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. “ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत,” असेही राऊत म्हणाले.

ऑडिओ क्लीपमध्ये नेमकं काय?

बबनराव लोणीकर – बबनराव लोणीकर बोलतोय आमदार.

दादासाहेब काळे, इंजिनिअर – नमस्कार साहेब बोला.

बबनराव लोणीकर – तुम्ही मीटर काढून नेलं का माझं?

दादासाहेब काळे, इंजिनिअर – नाही , मी कुठं काढून नेलं.

बबनराव लोणीकर – अरे नालायकांनो, आम्ही बिल भरतो. मी 10 लाख रुपये बिल भरलं, औरंगाबादचं. तुमच्या XXXदम आहे का? हिंमत आहे तर तुमच्यात… झोपडपट्टीत जा.. जे लोकं आकडे टाकतात त्यांच्याकडे जा. आम्ही पैसे भरतो. दोन मीटरचे मी 10 लाख रुपये भरले आहेत मी या वर्षात.

दादासाहेब काळे, इंजिनिअर – नाही सर, मी दोनदा येऊन गेलो.

बबनराव लोणीकर – एका मिनिटात घरी पाठवेल तुला. माज चढला का, पैसे आम्ही भरतो. ज्यांच्याकडे आकडे आहेत ना त्यांच्याकडे जा हिंमत असेल तर.

दादासाहेब काळे, इंजिनिअर – मीटर नाही काढून नेलं.

बबनराव लोणीकर – आमचं मीटर का काढून नेलं, नोटीस दिली का तुम्ही? मी पागल आहे का. मीटर काढून नेलं म्हणून बोलतोय.

दादासाहेब काळे, इंजिनिअर – सर तुमच्या बंगल्याचं मीटर आहे तिथेचं आहे. तीन लाखांचं बिल आहे.

बबनराव लोणीकर – तुम्ही मीटर काढून नेलं, मला फोन आला होता आता आमच्या ड्रायव्हरचा. पैसे भरतो ना आम्ही. नोटीस द्या. वीज वितरण कंपनी स्थापन झाली. कायद्यात नियम आहे तुम्हाला नोटीस दिल्याशिवाय असं करत येत नाही. एक फोन केला असता तुम्ही… पैसे भरतो आम्ही, मी जालन्याला तीन लाख रुपये भरले. मी तुम्हाला बोलतो माझी काही जबाबदारी नाही का? अरे राजा, 35 वर्षे झाली मला राजकारणात आहे. आम्ही एक रुपयाची वीज चोरत नाही. जे चोरी करतात त्यांच्या मागे लागण्याची हिंमत आहे का? ते तुम्हाला तोडतील.

दादासाहेब काळे, इंजिनिअर – मीटर काढलं नाही, मी कालच येऊन गेलो.

बबनराव लोणीकर – नियमित पैसे मी भरतो. आम्ही कुणाचे पैसे बुडवले नाही.

दादासाहेब काळे, इंजिनिअर – सर, दोन वर्षे झाली. मी दोनदा-तिनदा येऊन गेलो.

बबनराव लोणीकर – कसले दोन वर्षे झाले, मी मागच्याच वर्षी साडेचार लाख रुपये भरले आम्ही.

लोणीकर – मागच्याच वर्षी साडेचार लाख रुपये भरले आम्ही

वीज अभियंता – यादव नावाने मीटर आहे ना ते?

लोणीकर – कुणीही तिथं राहत नाही तरीही पैसे भरले

वीज अभियंता – नाही नाही मीटर काढून नेलं नाही…

लोणीकर – आम्ही तिथं राहत नाही तरीही पैसे भरले…

लोणीकर – नीट वागा एवढीच सूचना आहे, बाकी काही नाही

वीज अभियंता – काढून नेलेलं नाही सर

लोणीकर – काचेची बांगडी आहे.. *&$%# लावू शकतो…सस्पेंड करु शकतो…तुम्हाला नीट करु शकतो…

वीज अभियंता – विनाकारण का बोलता मला हेच कळत नाही…

लोणीकर – का बोलता म्हणजे तू मीटर काढून नेलं आणि नाही कसं काय म्हणतो…

वीज अभियंता – मी मीटर काढून नेलं नाही

लोणीकर – उद्या येऊन बघा ना काढून नेलं का नाही?  तुमच्या कुणीतरी नालायक लोकांनी नेलं असेल तुम्हाला काय माहिती. राजाला दिवाळी काय माहिती तुम्हाला. आम्ही पैसे भरणारे लोक आहोत…सूड उगवू नका. आयकर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकीन. तुम्ही काय काय प्रॉपर्टी घेतली, कुठं कुठं पैसे कमावले. तुम्ही काय करता आम्ही कुंडल्या ठेवतो तुमच्या. आमच्या नादी लागू नका…आमच्या नादी लागायचं नाही. आम्हाला सांगा एक फोन करा आम्ही पैसे भरायला तयार असतो. आम्ही कधीही पैसे बुडवणारे लोक नाहीयेत, अशा आशयाचा ऑडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

इतर बातम्या :  

ED Raid : ईडीचं धाडसत्र सुरुच; सतीश उकेंच्या घरावरील धाड आणि कारवाईनंतर पटोलेंचा मोंदीवर निशाणा

‘शरद पवार भीष्म पितामह, UPA कुणाची खासजी जागीर नाही’, संजय राऊतांनी पुन्हा काँग्रेसला डिवचलं! वाद पेटणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें