मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा रद्द, कलाकारांचा हिरमोड, स्पर्धा घ्या, अन्यथा… औरंगाबादेत कलाकारांचा ठिय्या

तीव्र नाराजी व्यक्त करत कलावंतांनी सांस्कृतिक कार्य संचलनालयात ठिय्या आंदोलन केले. ठरलेल्या वेळेत स्पर्धा घ्या, अन्यथा जमा केलेली रक्कम परत करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा रद्द, कलाकारांचा हिरमोड, स्पर्धा घ्या, अन्यथा... औरंगाबादेत कलाकारांचा ठिय्या
स्पर्धा रद्द झाल्याने औरंगाबादमधील कलाकारांचा हिरमोड

औरंगाबादः मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी मागील दोन महिन्यांपासून तयारी करणाऱ्या कलाकारांची वाढत्या कोरोना संसर्गामुळे मोठी निराशा झाली आहे. 15 जानेवारीपपासून ही राज्य नाट्यस्पर्धा घेतली जाणार होती. मात्र अचानक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत कलावंतांनी सांस्कृतिक कार्य संचलनालयात ठिय्या आंदोलन केले. ठरलेल्या वेळेत स्पर्धा घ्या, अन्यथा जमा केलेली रक्कम परत करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

ऐनवेळी हिरमोड

सांस्कृतिक कार्य संचलनालयाने सोशल मीडियाद्वारे या स्पर्धा पुढे ढकलत असल्याचा संदेश दिला. त्यामुळे कलावंत, दिग्दर्शकांना न विचारताच स्पर्धकांवर निर्णय लादण्यात आल्याचा कलावंतांचा आरोप आहे. स्पर्धा रद्द होणार असेल तर संघांनी जमा केलेली रक्कम परत करावी. तसेच प्रत्येक संघास 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लेखी आदेश अद्याप नाही

स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय सोशल मीडियाद्वारेच कलावंतांपर्यंत पोहोचला आहे. पूर्वीदेखील अशाच प्रकारे स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाने कलावंतांना विचारात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. 50 टक्केंच्या क्षमतेने नाट्यगृहे सुरु राहून, स्पर्धा घेतल्या जातील, अशी कलावंतांची अपेक्षा होती. तरीही स्पर्धा रद्द करण्यात आल्या. शासनाने किमान लेखी आदेश काढून पुढील तारीख कळवली पाहिजे, अशी अपेक्षा नाट्य कलावंत ऋषीकेश शेजूळ यांनी व्यक्त केली आहे.

इतर बातम्या-

VIDEO: पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला दांडी, पालिकेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Baby Shark Doo Doo | तब्बल 10 बिलियन Views घेणारा पहिला YouTube Video, असं काय ग्रेट आहे काय व्हिडीओत?


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI