औरंगाबाद: करमाड परिसरात कार तलावात कोसळली, दोन तास शोधूनही कारचा पत्ता नाही, प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता

दरम्यान पोलीस आणि अग्नीशामक दलाचे शोधकार्य सुरूच असून लवकरच या घटनेची माहिती देण्यात येईल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद: करमाड परिसरात कार तलावात कोसळली, दोन तास शोधूनही कारचा पत्ता नाही, प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता
करमाड परिसरातील बंधाऱ्यात कार कोसळली, शोध कार्य सुरू.

औरंगाबाद: जिल्ह्यातील करमाड परिसरातील (Karmad car Accident) जडगाव येथील सिमेंटच्या बंधाऱ्यात भरधाव वेगाने येणारी कार कोसळल्याची घटना घडली. ही कार एवढ्या जास्त वेगाने येऊन थेट बंधाऱ्यात कोसळली की त्यातील सर्व प्रवासी बुडाले. करमाडच्या जवळच असलेल्या जडगाव येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अजूनही या कार आणि प्रवाशांचा शोध घेणे सुरूच आहे.

दोन तास उलटूनही शोध लागला नाही

दरम्यान ही घटना घडल्याबरोबर परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. पोलीस व अग्निशमन दलाचे कर्मचारीही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेतील प्रवाशांचा पाण्यात उतरून शोध घेणे सुरु झाले. मात्र तब्बल एक तासभर पाण्यात कार आणि प्रवाशांचा शोध घेतल्यानंतरही त्यांचा पत्ता लागला नाही. करमाड येथील हा सिमेंटचा बंधारा खूप मोठा असून अजूनही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा तेथे शोध घेणे सुरू आहे. मात्र एवढ्या वेगाने आलेली कार बंधाऱ्यात पडल्यानंतर बहुधा यातील प्रवासी मृत पावले असण्याची शक्यता आहे.

शहरातील गजानन नगरातील प्रवासी

दरम्यान, या कारमध्ये बुडालेल्या व्यक्तींची नावेही कळाली आहेत. औरंगाबाद तालुक्यातील शेलुद येथील असून सध्या ते शहरातील गजानन नगर येथेच रहात होते. कारमधील व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे आहेत..
वैजीनाथ उमाजी चौधरी – 52
मंगल वैजीनाथ चौधरी – 45
सुकन्या मधुर चौधरी – 22

दरम्यान पोलीस आणि अग्नीशामक दलाचे शोधकार्य सुरूच असून लवकरच या घटनेची माहिती देण्यात येईल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पाचोडमधील कुतुबखेड्यात शेतमजुराची आत्महत्या

बायकोशी झालेल्या किरकोळ घरगुतीच्या कारणावरून एका कर्जबाजारी शेतमजुराने स्वतःच्या घरात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथे सोमवारी उघडकीस आली.भरत भिमराव एडके (50) असे आत्महत्या करणाऱ्या शेतमजुराचे नाव आहे.
कुतुबखेडा(ता.पैठण) येथील भरत एडके हे शेतमजूर म्हणून मिळेल ते कामे करून कुटुंबाला हातभार लावायचे तसेच त्यांच्या स्वतःकडे शेतजमीन नसल्याने त्यांनी गावाजवळील शासकीय गायरान जमीन कसण्यास सुरूवात केली. परंतु यंदा सततच्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतीवर लावलेला खर्च पदरात पडण्यापूर्वीच वाया गेल्याने त्यांनी इतरांकडून घेतलेले उसनेवारीचे पैसे कसे फेडायचे या आर्थिक विवेंचणातून नैराश्यातून त्यांनी सोमवारी (ता.11) घरी कोणी नसताना त्यांनी विषारी औषध प्राशन केले.
ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांना ग्रामीण रुणालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

इतर बातम्या- 

थरकाप उडवणारा खून, नसा कापल्या, कान छाटले, डोक्यात हातोड्याचे वार, छातीवर बसून गळा चिरला, औरंगाबाद हादरलं!

औरंगाबाद: ‘कवच कुंडल’ अंतर्गत उच्च न्यायालय, पोस्ट ऑफीस, विमानतळावरही लस, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI