AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला माहिती आहे? गर्भवतींना केंद्राकडून मिळतायत 5 हजार रुपये, औरंगाबादेत 83 हजार महिलांनी घेतला लाभ

औरंगाबाद: रोजंदारीवर काम करणाऱ्या तसेच खासगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या नोकरदार महिलांना अनेकदा आर्थिक अडचणींमुळे स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष केंद्रित करता येत नाही. किंबहुना स्वतःवर खर्च करायला महिलांकडून टाळाटाळ होते. त्यातच गर्भवती महिलांमध्ये (Pregnant Women) अशक्तपणा, रक्ताची कमतरता आदी लक्षणं जाणवू लागतात. तसेच याचे गंभीर परिणाम होऊन अपत्याचा मृत्यूही संभवतो. मातेची सुरक्षित प्रसूती आणि बालकांचे मृत्यू […]

तुम्हाला माहिती आहे?  गर्भवतींना केंद्राकडून मिळतायत 5 हजार रुपये, औरंगाबादेत 83 हजार महिलांनी घेतला लाभ
फिक्स्ड डिपॉझिट
| Edited By: | Updated on: Sep 03, 2021 | 7:10 PM
Share

औरंगाबाद: रोजंदारीवर काम करणाऱ्या तसेच खासगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या नोकरदार महिलांना अनेकदा आर्थिक अडचणींमुळे स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष केंद्रित करता येत नाही. किंबहुना स्वतःवर खर्च करायला महिलांकडून टाळाटाळ होते. त्यातच गर्भवती महिलांमध्ये (Pregnant Women) अशक्तपणा, रक्ताची कमतरता आदी लक्षणं जाणवू लागतात. तसेच याचे गंभीर परिणाम होऊन अपत्याचा मृत्यूही संभवतो. मातेची सुरक्षित प्रसूती आणि बालकांचे मृत्यू टाळता येण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government Of India) प्रधानमंत्री मातृ  वंदना (Pradhanmantri Matru Vandana Yojana- PMMVY) योजना राबवण्यात येत आहे. सरकारी कर्मचारी वगळता इतर सर्व स्तरातील गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेत पहिल्या जिवंत बाळासाठी गरोदर मातेस 5 हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो.

औरंगाबादेत सुमारे 35 कोटी रुपयांचा निधी

औरंगाबाद जिल्ह्यात या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 83 हजार 803 गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्या खात्यात योजनेतील टप्प्यांनुसार निधीही जमा झाला आहे. जिल्ह्यातील 88 हजार 273 महिलांनी योजनेसाठी अर्ज केला होता. मात्र त्यातील 83 हजार 803 महिला योजनेसाठी पात्र ठरू शकल्या. या योजनेतील निधीअंतर्गत लाभार्थींच्या खात्यात आतापर्यंत 34 कोटी 94 लाख 74 हजार रुपयांचा निधी केंद्र सरकारतर्फे जमा करण्यात आला आहे. सर्व पात्र लाभार्थींना हा लाभ थेट त्यांच्या वैयक्तिक बँकेचे खाते किंवा पोस्ट ऑफिसच्या खात्यावर जमा केला जातो. ही योजना ग्रामीण भाग, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका स्तरावर राबवण्यात येत आहे.

2017 पासून योजना, तीन टप्प्यात निधी

केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे राबवण्यात येणारी ही योजना 1 जानेवारी 2017 पासून अंमलात आली. या योजनेत पहिल्या जिवंत बाळासाठी गरोदर मातेस 5 हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. फक्त सरकारी नोकरदार वगळता इतर सर्व स्तरांतील महिलांना याचा लाभ घेता येईल. गरोदर महिलेस पहिल्या अपत्यासाठीची ही मदत तीन टप्प्यात दिली जाते. पहिल्या टप्प्यात आपल्या परिसरातील जवळच्या आरोग्य केंद्रात 100 दिवसाच्या आत नोंदणी करताच 1 हजार रुपये सदर पात्र महिलेच्या खात्यात जमा केले जातात. सहाव्या महिन्यानंतर एक तपासणी झाल्यानंतर योजनेचा दुसऱ्या टप्प्यातील 2 हजार रुपयांचा लाभ मिळतो. तसेच बाळाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर बाळाला 14 आठवड्यापर्यंत किमान बी.सी.जी., ओ.पी.व्ही., डी.पी.टी/पिन्टाव्हॅलेंट आणि हिपॅटायटीसचे प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर 2 हजार रुपयांचा अखेरच्या टप्प्यातील लाभ दिला जातो.

कुणाला लाभ घेता येणार नाही?

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) ही पुढील प्रकारच्या गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना लागू होणार नाही. यात 1) केंद्र किंवा राज्य सरकार किंवा एखाद्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाशी निगडीत असून नियमित रोजगार प्राप्त करतात, त्यांना ही योजना लागू नाही. 2) ज्या महिला इतर कोणत्या योजना किंवा कायद्याअंतर्गत समान लाभ घेत असतील, त्यांच्यासाठीदेखील ही योजना लागू होत नाही. अशा महिलांचे अर्ज फेटाळले जाऊन त्या योजनेसाठी अपात्र ठरतात. (Central Government scheme for Pregnant women in India, you can get 5 thousand)

इतर बातम्या- 

मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दररोज 7 रुपये गुंतवा, दरमहा 5000 कमवा, नेमकी योजना काय?

FD पेक्षा जास्त कमाई करणारी योजना, कधी आणि केव्हा गुंतवणूक कराल, जाणून घ्या

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.