AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा! दोन दिवसात दुष्काळाचा जीआर… मुख्यमंत्र्यांची लातूरमध्ये येताच मोठी घोषणा

मुख्यमंत्र्यांची लातूरमध्ये दुष्काळग्रस्तांना मोठी घोषणा. मराठवाड्यात, विशेषतः लातूरमध्ये, 1972 नंतरच्या भीषण दुष्काळामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकार सरसकट मदत करणार आहे. येत्या दोन दिवसांत दुष्काळ निवारणासाठी जीआर काढणार असून, रब्बी पिकांनाही मदत दिली जाईल.

शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा! दोन दिवसात दुष्काळाचा जीआर... मुख्यमंत्र्यांची लातूरमध्ये येताच मोठी घोषणा
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 12:42 PM
Share

मराठवाड्यात प्रचंड मोठा दुष्काळ पडला आहे. 1972ला झाला होता तसा दुष्काळ झाला आहे. खूप मोठं नुकसान झालं आहे. पण तुम्ही चिंता करू नका. सरकार तुमच्या पाठिशी आहे. येत्या दोन दिवसात आम्ही दुष्काळाचा जीआर काढणार आहोत. दुष्काळासाठीची सर्व मदत करणार आहोत. रब्बी पिकं घेता आली तर त्यासाठीही मदत करणार आहोत, असं सांगतानाच तुमचं सरसकट नुकसान झाल्याने आम्ही तुम्हाला सरसकट मदत करणार आहोत, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूरच्या दौऱ्यावर आहेत. औसा आणि निलंग्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना येत्या दोन दिवसात दुष्काळाचा जीआर काढणार असल्याची घोषणा केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जलसंधारणाची कामे हाती घेणार आहोत. रोजगार निर्मितीचीही कामे हाती घेणार आहोत. या संकटात तुम्ही एकटे नाही. आम्ही सर्व शक्तीने तुमच्यासोबत आहोत. आपण कर्ज माफी केली. 48 हजार कोटींचं जुन लाईट बील माफ केलं. हे बील कधीच वसूल करण्यात येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

संकटात एकमेकांना मदत करू

थोडा धीर ठेवा. लवकर मदत करू. तुम्हाला लवकर मदत नाही मिळाली तर अडचण वाढेल हे आम्हालाही कळतं. आम्ही पंचनामे करत आहोत. पंचनामे कायदा म्हणून करावे लागत आहेत. कायद्याची तरतूद आहे म्हणून पंचनामे करत आहोत. आम्ही थांबत नाही. तुमचं नुकसान सरसकट झालेलं आहे. त्यामुळे सरसकट मदत करणार आहोत. तीन चार महिने आपल्यासाठी आव्हानाचे आहेत. या संकटात एकमेकांना मदत करून पुढे जाऊ, असं फडणवीस म्हणाले.

धीर ठेवा, तुमच्यासोबत आहोत

कर्जमाफीचं काम अजूनही सुरू आहे. जोपर्यंत कर्जमाफीचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. कर्जमाफीचे पैसे देऊ. दुष्काळाचे पैसे लवकरात लवकर खात्यात टाकू. 1972 नंतर इतका मोठा दुष्काळ पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. मागच्या काळात 64 टक्के पाऊस झाला होता. आता 50 टक्के पाऊस झाला आहे. पण चिंता करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. जे चांगलं आहे ते करू. तुम्हाल मदत करणयात मागे पुढे पाहणार नाही. धीर ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं.

सर्वाधिक परिणाम लातूरवर

मराठवाड्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पण सर्वाधिक परिणाम लातूरवर झाला आहे. त्यातून आपण मार्ग काढणार आहोत. चारा आणि पाण्याचं नियोजन केलं आहे. कोल्हापूर आणि सांगलीतून पाणी आणलं जाणार आहे. जी काही मदत लागेल ती आम्ही करणार आहोत. तुम्हाला आर्थिक मदत दिली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?