5

70 टक्के बेड रिकामे, ऑक्सिजनची मागणीही घटतीय, औरंगाबादकरांनी महिनाभरात ‘करुन दाखवलं!’

औरंगाबादमधील 70 टक्के खाटा रिकाम्या आहेत. शिवाय ऑक्सिजनची मागणीही घटली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हावासियांनी महिन्याभरात चित्र पालटून दाखवलं, असं म्हणता येईल. (Corona cases in Aurangabad second Wave in Control bed Available)

70 टक्के बेड रिकामे, ऑक्सिजनची मागणीही घटतीय, औरंगाबादकरांनी महिनाभरात 'करुन दाखवलं!'
औरंगाबादमधील 70 टक्के खाटा रिकाम्या आहेत. शिवाय ऑक्सिजनची मागणीही घटली आहे.
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 10:03 AM

औरंगाबाद : महिनाभरापूर्वी ज्या औरंगाबादमध्ये कोरोनाने हैदोस घातला होता, मोठ्या संख्येने रुग्णसंख्या मिळत असल्याने खाटाही अपुऱ्या पडत होत्या, रुग्णांच्या नातेवाईकांना बेडसाठी धावाधाव करावी लागत होती. परंतु आता कोरोनाचा आकडा दिवेसंदिवस कमी होऊ लागला आहे. कोरोनाची साखळी तुटायला हळूहळू सुरुवात झाली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील 70 टक्के खाटा रिकाम्या आहेत. शिवाय ऑक्सिजनची मागणीही घटली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हावासियांनी महिन्याभरात चित्र पालटून दाखवलं, असं म्हणता येईल. (Corona cases in Aurangabad second Wave in Control bed Available)

महिनाभरापूर्वी हजारोंनी रुग्ण, आता सरासरी 300 ते 500

महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांत कोरोनाने धुमाकूळ घातला. यामध्ये मुंबई, पुणे, सातारा, औरंगाबाद या आणि अशा काही शहरांचा समावेश होता. औरंगाबाद जिल्ह्यात महिनाभरापूर्वी दररोज हजारो रुग्ण मिळत होते. पण नागरिकांनी केलेलं सहकार्य, शासनाने उचलेली कठोर पावलं, प्रशासनाचं योग्य नियोजन आणि व्यवस्था या सामूहिक प्रयत्नांनी औरंगाबादमधील रुग्णसंख्येचा आलेख चांगलाच घटलाय. परिणामी ज्या रुग्णांच्या नातेवाईकांना बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत होती, आता मात्र जिल्ह्यातील 70 टक्के खाटा रिकाम्या आहेत.

बाधितांची संख्या कमी, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

सरकारने घालून दिलेले निर्बंधांना नागरिकांनी देखील चांगली साथ दिली. त्याचमुळे औरंगाबादच्या रुग्णसंख्येचा आलेख झटपट खाली आला. औरंबादमध्ये बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजेच 26 एप्रिल रोजी 12 हजार 795 अॅक्टिव्ह रुग्ण होते, म्हणजेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता आजघडीला सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास 60 टक्क्यांनी घटली आहे. तसंच नव्याने कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी मोठी आहे.

औरंगाबादकरांनो तुम्ही करुन दाखवलं पण संकट संपलेलं नाही…..!

शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे तसंच नागरिकांच्या शिस्तीमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे. पण कोरोनाचं संकट अजूनही दूर झालेलं नाहीय. त्यामुळे नागरिकांनी आता तसे नियम पाळत होते, तसेच नियम इथून पुढच्या काळामध्येही पाळणं गरजेचं आहे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

हे ही वाचा :

लॉकडाऊनमुळे स्वप्नांचा चक्काचूर, शेतकऱ्याचे 200 टन पेरु खराब, 8 ते 10 लाखांचं नुकसान!

औरंगाबादेत ‘त्या’ रुग्णालयाकडे परवानगी नसताना कोरोनाग्रस्तांवर उपचार, रुग्ण न्याय हक्क परिषदेचा आरोप

Non Stop LIVE Update
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?