Aurangabad: कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेविकेचा हृदयविकाराने मृत्यू, वैजापुरात हळहळ!

कोरोना काळात आणि लसीकरण मोहिमेत मोठे योगदान देणाऱ्या वैजापूरमधील उप जिल्हा रुग्णालयातील वैशाली टाक यांचा सोमवारी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सक्रिय कोरोना योद्धा हरपल्याने वैजापूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Aurangabad: कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेविकेचा हृदयविकाराने मृत्यू, वैजापुरात हळहळ!
वैजापूरमध्ये आरोग्य सेविकेचा हृदयविकाराने मृत्यू

औरंगाबादः कोरोना लसीकरण मोहिमेत सक्रियतेने सहभाग नोंदवणाऱ्या आरोग्य सेविकेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना 29 नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. वैशाली टाक (45) असे मृत आरोग्य सेविकेचे (Health worker) नाव असून त्या मूळच्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी होत्या. सोमवारी सकाळली कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे आरोग्य विभागासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

2008 पासून उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत

वैशाली टाक असे या मृत आरोग्यसेविकेचे नाव असून त्या मूळच्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी होत्या. 2008 पासून त्या शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या. तेव्हापासून त्या वैजापूरमध्येच रहात होत्या. सोमवारी सकाळी 10 वाजता त्या लसीकरण करण्यासाठी रुग्णालयात हजर झाल्या. परंतु अचानक त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी ही माहिती

कोरोना योद्धा म्हणून ओळख

कोरोना काळात मागील दोन वर्षात वैशाली टाक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यामुळे या परिसरात त्या कोरोना योद्धा म्हणून ओळखल्या जात होत्या. दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील कापूसवाडगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका भारती माळी (51) यांचा दुचाकीवरून पडून अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर लगेच टाक यांच्या मृत्युमुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मोठा धक्का आहे.

इतर बातम्या-

School Reopens: औरंगाबाद शहरात पहिली ते पाचवीच्या शाळा 10 डिसेंबरपासून सुरू होणार, महापालिकेचा निर्णय

Corona: विदेशातून आलेल्यांची माहिती कळवा,लसवंत नसलेल्या संस्थेला टाळे! औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI