AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दसऱ्याला खरे सोने लुटताय ना? नव्या गोकाक कलेक्शनची महिलांना भुरळ, वाचा औरंगाबादचे भाव

औरंगाबादमधील सोन्याचे भाव आज काहीसे वाढलेले दिसून आले. 22 कॅरेट सोन्याचे दर 47,800 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे दर 49,500 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. औरंगाबादमध्ये एक किलो शुद्ध चांदीचे दर आज 64,800 रुपये एवढे आहेत.

दसऱ्याला खरे सोने लुटताय ना? नव्या गोकाक कलेक्शनची महिलांना भुरळ, वाचा औरंगाबादचे भाव
औरंगाबादमध्ये महिला वर्गाच्या पसंतीस उतरेली हुडीमाळ तर दुसऱ्या छायाचित्रात गोकाक कलेक्शनचे दागिने
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 2:00 PM
Share

औरंगाबाद: खरेदीसाठीच्या उत्तम मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त औरंगाबादच्या (Aurangabad Sarafa market) सराफा बाजारात चांगलीच वर्दळ पहायला मिळत आहे. शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी सोन्याच्या खरेदीवर आकर्षक सवलतही दिली आहे. त्यामुळे अष्टमीपासूनच विविध दागिने, शुद्ध सोन्याचे वेढ आणि हिऱ्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.

शहरातील सोन्या-चांदीचे भाव काय?

औरंगाबादमधील सोन्याचे भाव आज काहीसे वाढलेले दिसून आले. 22 कॅरेट सोन्याचे दर 47,800 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे दर 49,500 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. औरंगाबादमध्ये एक किलो शुद्ध चांदीचे दर आज 64,800 रुपये एवढे आहेत, अशी माहिती औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलीक यांनी दिली.

पीएनजीची 7 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत ऑफर

आघाडीचा ज्वेलरी ब्रँड पीएनजी ज्वेलर्सने ‘अनोखी दिवाळी’ मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम 7 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरदरम्यान पीएनजी ज्वेलर्सच्या सर्व स्टोअर्समध्ये सुरू आहे. या मोहिमेत सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मिलाफाद्वारे एक नवीन व आकर्षक कल निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. याअंतर्गत इअररिंग्ज, नेकलेस, पेंडंट, बँगल्स, रिंग्ज इत्यादींचे आकर्षक डिझाइन सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या रूपात उपलब्ध असतील. पीएनजी ज्वेलर्सतर्फे सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 20 टक्क्यांपर्यंत, तर हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी ही माहिती दिली. सध्या डायमंडचा भाव 69,900 पर कॅरेट असा नोंदला गेला आहे, ही माहिती पीएनजीच्या काल्डा कॉर्नर येथील दालनाचे मालक प्रीतम बोरा यांनी दिली.

ओरिजनल वेढ, लक्ष्मीच्या कॉइनलाही मागणी

औरंगाबादच्या सराफा बाजारात महिला वर्गाकडून दागिन्यांची मागणी जास्त होत असतानाच, शुद्ध सोन्याच्या वेढांनाही तेवढीच मागणी असल्याचे दिसून येते. तसेच लक्ष्मीची प्रतिमा असलेल्या कॉइनलाही नागरिकांची जास्त पसंती असल्याचे दिसून येत आहे. मंगळसूत्र, टेंपल ज्वेलरी, गोकाक कलेक्शनची ज्वेलरी आदी दागिन्यांना जास्त मागणी आहे.

नव्या गोकार्क कलेक्शनची भुरळ

सध्या दागिन्याच्या प्रकारांमध्ये दक्षिण भारतीय गोकाक कलेक्शनचे आकर्षण महिला वर्गात जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यातही हुडीघाट माळाची जास्त क्रेझ महिलांमध्ये पहायला मिळत आहे. या दागिन्यात आतील बाजूने लाख वापरलेली असल्याने त्यांचे वजन कमी भरते. दिसायला भरगच्च आणि फँसी प्रकार असल्याने असंख्य महिलांना सध्या या दागिन्याची भुरळ पडली आहे, अशी माहिती बोरा यांनी दिली.

इतर बातम्या-

सोन्याचा भाव 49 हजारांवर, दसऱ्याला सोन्याची रेकॉर्डब्रेक विक्री होण्याचा अंदाज

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.