औरंगाबाद : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. ते शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने औरंगाबादला गेले आहेत. या दरम्यान आदित्य ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत एक अतिशय अनपेक्षित घटना घडली. आदित्य ठाकरे यांच्या सभेदरम्यान मोठा गोंधळ उडाला. अखेर आदित्य ठाकरे यांच्या आवाहनानंतर जमाव शांत झाला. पण या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा दावा केलाय. आदित्य ठाकरे यांच्या सभेवेळी एक मोठा दगड आला होता. तसेच सभेवरुन निघताना काही दगड गाडीवर आले होते, असा धक्कादायक दावा अंबादास दानवे यांनी केलाय. त्यामुळे या घटनेवर आता पोलीस काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.