गंगापूर साखर कारखाना घोटाळा : प्रशांत बंब यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ, सभासदांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणी सभासदांचा जामीन नाकारण्यात आला आहे.

गंगापूर साखर कारखाना घोटाळा : प्रशांत बंब यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ, सभासदांचा जामीन न्यायालयाने फेटाळला
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 9:13 AM

औरंगाबाद : भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे (Gangapur Sakhar Karkhana Scam MLA Prashant Bamb). गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणी सभासदांचा जामीन नाकारण्यात आला आहे. वैजापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सभासदांचा जामीन नाकारला आहे. सभासदांचा जामीन फेटाळल्याने प्रशांत बंब यांच्या अडचणी वाढल्या आहेत (Gangapur Sakhar Karkhana Scam MLA Prashant Bamb).

गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणातील सहा सदस्यांनी वैजापूर जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. जामीन नाकारल्यामुळे सभासदांवर अटकेची टांगती तलवार आहे. सभासदांचा जामीन नाकारल्यामुळे आमदार प्रशांत बंब यांचाही जामीन अधांतरी आहे. सभासदांना जामीन मिळत नसल्यामुळे प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे.

गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर प्रकरणी प्रशांत बंब यांच्यावर गुन्हा

औरंगाबादमध्ये आमदार प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे या गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात कारखान्यात निधीची अफरातफर झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रशांत बंब यांनी बनावट कागदपत्रं तयार करुन सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर कारखान्यातील सभासदांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल केला गेला (Gangapur Sakhar Karkhana Scam MLA Prashant Bamb).

गंगापूर कारखान्यात पैशांचा अपहार?

गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. पण, खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांची डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते. पण, त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. यावर प्रशांत बंब आणि त्यांच्यासह काही जणांनी यावर कारखान्याचे पैसे नसल्याचं म्हटलं. या प्रकरणात 14 सभासदांची फसवणूक झाल्याचाही आरोप आहे.

Gangapur Sakhar Karkhana Scam MLA Prashant Bamb

संबंधित बातम्या :

भाजप आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल, 15 कोटी 75 लाखांचा अपहार केल्याचा आरोप

माफी मागा अन्यथा 23 कोटींचा दावा दाखल करु, प्रशांत बंब यांची चिखलीकरांना नोटीस

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.