औरंगाबादेत गँगवॉर! 9 जणांनी मिळून तरुणावर केले तब्बल 35 चाकूचे वार, निर्घृण खून!

औरंगाबादेत गँगवॉर! 9 जणांनी मिळून तरुणावर केले तब्बल 35 चाकूचे वार, निर्घृण खून!
मृत हसन आणि घटनास्थळावरील बुलेट

जुन्या भांडणातून वाद झाल्यामुळे औरंगाबादेत 9 जणांनी मिळून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना औरंगाबादेत घडलीय. गँगवॉरमधून हा थरारक प्रकार समोर आला असून मिसारवाडीतील गल्ली नंबर 9 मध्ये ती घडली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 17, 2022 | 10:18 AM

औरंगाबादः जुन्या भांडणातून वाद झाल्यामुळे औरंगाबादेत 9 जणांनी मिळून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना औरंगाबादेत घडलीय. गँगवॉरमधून हा थरारक प्रकार समोर आला असून मिसारवाडीतील गल्ली नंबर 9 मध्ये ती घडली. या घटनेत हसन पटेल या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन तर जिन्सी पोलिसांनी दोन आरोपींना चोवीस तासांच्या आत अटक केली. उर्वरीत पाच जणांचा शोध पोलीस घेत आहे.

गँगवॉरमधून घडला थरारक प्रकार

शहरात गोल्डन गँग आणि चाऊस गँग नावाच्या दोन टोळ्या कुख्यात आहेत. जो त्यांच्या विरोधात जातो, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला जातो. या दोन्ही गँगचे आरोपी परस्परांचे मित्र आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी मृत हसन पटेल व त्याचा साथीदार शेख मतीन ऊर्फ मत्या शेख अजीज यआणि शेख मोबीन शेख अजीज यांनी चाऊस गँगच्या तालेब चाऊसच्या डोक्यावर, हातावर आणि मांडीवर मिसारवाडीत चाकूने वार केले होते. या हल्ल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी दोन्ही गँगमध्ये समझोताही झाला होता.

शनिवारी रात्री काय घडलं?

हसन शनिवारी रात्री मित्राच्या वाढदिवसासाठी बाहेर पडला. नंतर त्याचा मोबाइल बंद झाला. मित्र परिवार त्याला शोधण्यासाठी निघाला. मिसारवाडीत तो एका टपरीजवळ सापडला. तेवढ्यात 9 जणांचे टोळके हसनच्या दिशेने धावत आला. त्यांनी हसनवर सपासप चाकूचे वार केले. गळा, छाती, पोट, मानेवर वार झाल्याने अति रक्तस्राव झाल्याने हसनचा जागीच मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

9 पैकी 4 आरोपींना अटक

या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी आकेब ऊर्फ गोल्डन कुरेशी याला सिल्लेखान्यातून पकडले. दुसरा आरोपी शेख मुसा ऊर्फ करीम नासेर शेख याला वैजापूर येथून पकडण्यात आले. तर महंमद रियाज आणि राहिल अन्सारी यांनाही पकडण्यात आले. उर्वरीत पाच आरोपीही लवकरच पकडले जातील, असे पोलिसांनी सांगितले.

इतर बातम्या-

Kolhapur | ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी पाटील यांची प्रकृती गंभीर; खासगी रुग्णालयात उपचार सुरु

VIDEO : काय सांगता…! चक्क करीना कपूर खान पुणे पोलिसांची झाली फॅन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें