औरंगाबादेत लक्झरी ऑडी क्यू-5 निर्मितीचे काम पुन्हा सुरू, नोव्हेंबरमध्ये बाजारात येणार

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गुरुप्रताप बोपाराय आणि ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंग ढिल्लन यांनी नुकतेच एका कार्यक्रमात क्यू-5 चे अनावरण केले.

औरंगाबादेत लक्झरी ऑडी क्यू-5 निर्मितीचे काम पुन्हा सुरू, नोव्हेंबरमध्ये बाजारात येणार
औरंगाबादमधील एका कार्यक्रमता क्यू 5 चे अनावरण झाले.
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 3:47 PM

औरंगाबाद: जर्मनीतील आघाडीची ऑटोमोबाइल कंपनी ऑडी’ने (German Audi Q5,) एकदम नव्या कोऱ्या क्यू- 5 फेसलिफ्ट एसयूव्ही मॉडेलची औरंगाबादच्या प्रकल्पात निर्मिती सुरू केली आहे. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गुरुप्रताप बोपाराय (Gurupratap Boparay) आणि ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंग ढिल्लन (Balbeersingh Dhillan) यांनी नुकतेच एका कार्यक्रमात क्यू-5 चे अनावरण केले. गेल्या वर्षी कंपनीने या वाहनाचे उत्पादन थांबवले होते. भारत सरकारने बीएस- 6 चे नियम लागू केल्यावर कंपनीने गेल्या वर्षी या कारचे उत्पादन थांबवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या रूपात क्यू-5 भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. नोव्हेंबरमध्ये ही आलिशान गाडी विक्रीसाठी उपलब्ध होईल.

2007 पासून ऑडीची निर्मिती

औरंगाबादच्या शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीतील स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पात 2007 पासून ऑडीची निर्मिती होते. ऑडी क्यू-५ पूर्वी डिझेल मॉडेलमध्ये उपलब्ध होती. मात्र, भारत सरकारने बीएस- 6 चे नियम लागू केल्यावर कंपनीने गेल्या वर्षी या कारचे उत्पादन थांबवले. त्यानंतर ऑक्टोबरपासून औरंगाबादच्या प्रकल्पात पेट्रोल इंजिन असणाऱ्या “क्यू-5’ फेसलिफ्टची नवीन आकर्षक रूपात निर्मिती सुरू केल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

स्टायलिश लूकची ऑडी क्यू-5

औरंगाबादमध्ये तयार होणाऱ्या क्यू-5 मध्ये 2.0 लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन आहे. एलईडी हेडलॅम्प, रेडिएटर ग्रील्समुळे याचा लूक अधिक स्टायलिश आहे. काही फीचर्स ऑडी ए-6 शी बरोबरी करणारे आहेत. एमआयबी 3 इन्फोटेनमेंट प्लॅटफॉर्मवरील टचस्क्रीनचा डॅशबोर्ड अलेक्सावर चालणारा आहे. भारतात क्यू-5 ची स्पर्धा बीएमडब्ल्यू एक्स 3, लँड रोव्हर डिस्कव्हरी स्पोर्ट‌्स आणि मर्सिडीज बेन्झ जीएलसीसोबत राहील.

कारची किंमत 53 ते 58 लाख रुपये

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गुरुप्रताप बोपाराय आणि ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंग ढिल्लन यांनी नुकतेच एका कार्यक्रमात क्यू-5 चे अनावरण केले. नोव्हेंबरपासून ही कार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. याचे दर 53 ते 58 लाख रुपयांदरम्यान असतील. सध्या कंपनीच्या औरंगाबाद प्रकल्पात ऑडी ए-4, ऑडी ए-6 ऑडी क्यू 5, ऑडी क्यू 7, ऑडी क्यू 3 आणि ऑडी ए-3 सेडानची निर्मिती होते.

एंड्रेस अँड हाऊजर कंपनीने सुरु केल्या ई-बस

वाळूज औद्योगिक वसाहतीतील एंड्रेस अँड हाऊजर (Endress+Hauser (India) Pvt. Ltd.) कंपनीने नुकतीच ‘गो ग्रीन’ संकल्पना राबवून मोठे पाऊल टाकले आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या दोन बसेस उपलब्ध करून दिल्या. कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या या दोन बसचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. या वेळी बसवरील निळा कपडा हटवण्यात आला. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी नवीन बसचे स्वागत केले.

इतर बातम्या-

औरंगाबाद : प्रसिद्ध खुलताबाद ऊरुसात यंदा सांस्कृतिक कार्यक्रम नाहीत, यात्रा रद्द, बालक व वृद्धांना घरीच थांबण्याचे आवाहन

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.