गली मे मारे फेरेsss बॉयफ्रेंडला पाहण्यासाठी आतूर गर्लफ्रेंड, मैत्रिणींसोबत बसत होती टेरेसवर.. काय झालं पुढे?

दामिनी पथकाने या मुलींची आणखी चौकशी केली असता प्रेमकहाणीचा पुढचा टप्पाही समोर आला. या भागाची चाचपणी करून बॉयफ्रेंडला मोबाइल घेऊन देण्याचाही त्याच्या मैत्रिणीचा प्लॅन होता.

गली मे मारे फेरेsss बॉयफ्रेंडला पाहण्यासाठी आतूर गर्लफ्रेंड, मैत्रिणींसोबत बसत होती टेरेसवर.. काय झालं पुढे?
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 3:36 PM

औरंगाबाद: दोन वर्षांपासून बॉयफ्रेंडची भेट न झाल्यामुळे त्याला पाहण्यासाठी औरंगाबादमधली (Girlfreind in Aurangabad) एक गर्लफ्रेंड चांगलीच आतूर झाली होती. मग काय,  ही गर्लफ्रेंड मैत्रिणींना घेऊन बॉयफ्रेंडच्या घरासमोरील एका अनोळखी सोसायटीच्या टेरेसवर रोज येऊ लागली. या तीन अनोळखी मुली रोज टेरेसवर येऊन काय करतायत, असा संशय रहिवाश्यांना आला. त्यानुसार लोकांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचा ठरवलं आणि शहरातील दामिनी पथकाला पाचारण केलं. दामिनी पथकातील (Damini Team, Auarangabad) अत्यंत सजग, कर्तव्यदक्ष पोलिसांनी संपूर्ण प्रकरण समजून घेत, मुलींची चांगलीच कानउघडणी केली.

तीन दिवसांपासून ती येत होती टेरेसवर

शहरातील दामिनी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एएस क्लब हॉटेलच्या पाठीमागील भागात स्नेहा वाटिका सोसायटी आहे. तेथील एका इमारतीच्या टेरेसवर मागील तीन दिवसांपासून तीन मुली येत होत्या. विशेष म्हणजे या मुली विशिष्ट कॉलेजचा ड्रेस घालून येत असत. सुरुवातीला त्या कुणाला तरी भेटायला आल्या असतील आणि नंतर टेरेसवर बसल्या असतील, असे नागरिकांना वाटले. मात्र नंतर चौकशी केल्यास सोसायटीतील कुणाचीही त्यांच्याशी ओळख नव्हती. तेव्हा मात्र नागरिकांना संशय आला. त्यांनी रविवारी या मुलींना पकडून ठेवले आणि शहर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

दामिनी पथक थेट पोहोचले घटनास्थळी

शहर नियंत्रण कक्षाने या घटनेची माहिती दामिनी पथकाला दिली. दामिनी पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, पोलीस नाईक निर्मला निंभोरे, आशा गायकवाड, साक्षी संगमवाड, प्राप्ती साठे या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी सर्वप्रथम या नागरिकांची समजूत घालून मुलींची सुटका करून घेतली. नंतर मुलींची विचारपूस केली असता तिघींपैकी एकीचा बॉयफ्रेंड जवळच्याच एका बंगल्यात रहात असल्याचे कळाले. विशेष म्हणजे बॉयफ्रेंडच्या कुटुंबियांनी मागील दोन वर्षांपासून त्याची भेट दिलेली नव्हती. त्यामुळे त्याची ही मैत्रीण मित्राच्या भेटीसाठी आतूर झाली होती. मग काय.. ही गर्लफ्रेंड आपल्या मैत्रिणींना सोबत घेऊन त्याला पाहण्यासाठी रोज त्या अनोळखी सोसायटीच्या टेरेसवर जाऊन बसत होती.

बॉयफ्रेंडला द्यायचा होता मोबाइल

दरम्यान, दामिनी पथकाने या मुलींची आणखी चौकशी केली असता प्रेमकहाणीचा पुढचा टप्पाही समोर आला. या भागाची चाचपणी करून बॉयफ्रेंडला मोबाइल घेऊन देण्याचाही त्याच्या मैत्रिणीचा प्लॅन होता. मुलींनीच यासंबंधीची कबूली दामिनी पथकाकडे दिली.

मुलींना समज देऊन नातेवाईकांच्या ताब्यात दिले

शहरातील निर्जन ठिकाणी फिरणाऱ्या जोडप्यांना, एकेकट्या मुला-मुलींवर लक्ष ठेवून समाजात कायदा व शिस्तीचे पालन होतेय की नाही, यासाठी सतत दक्ष असलेल्या दामिनी पथकाने या प्रकरणातही योग्य भूमिका बजावली. या प्रकरणी मुलींना योग्य समज देऊन त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, शहरात समोर आलेली ही अजब प्रेमकहाणी अनेकांच्या चर्चेचा विषय बनली.

इतर बातम्या- 

दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, माझा जीव जळून जातो, मला एकही पटेना, पठ्ठ्याचं थेट आमदारांना पत्र

प्रेयसीचा साखरपुडा, लॉजमध्ये बोलावून प्रियकराकडून चाकूचे वार, नंतर रेल्वेखाली उडी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.