रेल्वे रुळांवरील मृतदेहाचं गूढ सीसीटीव्हीने उलगडलं, लग्नाचा तगादा लावल्याने प्रेयसीची हत्या

सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या तरुणीच्या अंगावर असलेले कपडे हे मृतदेहाच्या अंगावर आढळलेल्या कपड्याच्या वर्णनाशी जुळून आले. त्यासाठी पोलिसांच्या एक टीमने सुरतला जाऊन तपासणी केली असता, हत्या प्रकरणाचे सर्व धागेदोरे हाती लागले.

रेल्वे रुळांवरील मृतदेहाचं गूढ सीसीटीव्हीने उलगडलं, लग्नाचा तगादा लावल्याने प्रेयसीची हत्या
नंदुरबारमध्ये सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं
जितेंद्र बैसाणे

| Edited By: अनिश बेंद्रे

Sep 07, 2021 | 2:45 PM

नंदुरबार : नंदुरबार परिसरातील बिलाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ सापडलेल्या युवतीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधाराने हत्या प्रकरणातील आरोपीला गुजरात राज्यातून अटक करण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेचा मृतदह रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. लग्नाचा तगादा लावल्यानेच तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

सीसीटीव्हीमध्ये प्रेमी युगुल कैद

कुठलाही पुरावा नसल्याने अनोळखी मृतदेहाचा तपास लावण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. मात्र पोलिसांनी पाचोराबारी येथील रेल्वे फाटकाजवळ राहणारे कल्पेशभाई पटेल यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी केली. त्यावेळी एक तरुण आणि एक तरुणी सुरतच्या दिशेने येऊन नंदुरबारच्या दिशेने जाताना दिसली.

सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या तरुणीच्या अंगावर असलेले कपडे हे मृतदेहाच्या अंगावर आढळलेल्या कपड्याच्या वर्णनाशी जुळून आले. त्यासाठी पोलिसांच्या एक टीमने सुरतला जाऊन तपासणी केली असता, हत्या प्रकरणाचे सर्व धागेदोरे हाती लागले.

लग्नाचा तगादा लावल्याने हत्या

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. आमचं फोनवरून प्रेम झालं होतं, मात्र ती वारंवार लग्नासाठी मागे लागत असल्यामुळे त्याच रागातून हत्या झाल्याचा दावा आरोपीने केला. मुलगी बिहारच्या छपरा येथील, तर आरोपी तरुण सिवन चा रहिवासी आहे.

कल्याणमध्ये महिलेची हत्या, पतीवर संशय

दुसरीकडे, कल्याणच्या हाय प्रोफाईल गांधारी परिसरात दिवसाढवळ्या एका घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोड रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते आहे. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे. ती त्याच परिसरात घरकाम करते. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. जालना जिल्ह्यात राहणारा लक्ष्मीचा पती आणि संशयित जनार्दन मोहिते सध्या बेपत्ता आहे

संबंधित बातम्या :

मंदिरात जाताना पहाटे धारदार शस्त्राने हत्या, विरारच्या बिल्डरच्या हत्येचं गूढ उलगडलं

मायलेकीसह अल्पवयीन मुलगा राहत्या घरी मृतावस्थेत, मीरा रोडमध्ये खळबळ

लक्स कोझीच्या मालकाला मान्य नव्हतं लेकीचं प्रेम, जावई आढळलेला रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें