औरंगाबादचे शासकीय आयटीआय राज्यात दुसरे, मुलींचे आयटीआय विभागातून पहिले, नवाब मलिक यांच्या हस्ते पुरस्कार

यवतमाळ शासकीय आयटीआय, औरंगाबाद शासकीय आयटीआय आणि कुर्ला येथील डॉन बॉस्को खाजगी आयटीआय यांना अनुक्रमे राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

औरंगाबादचे शासकीय आयटीआय राज्यात दुसरे, मुलींचे आयटीआय विभागातून पहिले, नवाब मलिक यांच्या हस्ते पुरस्कार
औरंगाबाद आयटीआय कॉलेजला उत्कृष्टतेचे दुसरे पारितोषिक प्रदान
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 10:53 AM

औरंगाबादः मुंबईत काल गुरुवारी राज्यातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) (ITI Collage) कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक (Nawab Malik ) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात औरंगाबादच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ‘उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’चा (Best ITI) दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. तर विभागीय उत्कृष्ट आयटीआय म्हणून भडकल गेट परिसरातील मुलींच्या शासकीय आयटीआयला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

3 लाख रुपयांच्या पारितोषिकाने प्राचार्य आल्टे यांचा गौरव

यवतमाळ शासकीय आयटीआय, औरंगाबाद शासकीय आयटीआय आणि कुर्ला येथील डॉन बॉस्को खाजगी आयटीआय यांना अनुक्रमे राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. या महाविद्यालयांना अनुक्रमे 5 लाख, 3 लाख व 2 लाख रुपये तसेच सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरुपातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंत्री नवाब मिलक यांनी प्राचार्य अभिजीत आल्टे यांचा 3 लाख रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुरुवारी पार पडलेल्या सोहळ्याला कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, व्यवसाय शि७ण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसंचालक योगेश पाटील यांच्यासह पुरस्कार विजेत्या आयटीआयचे आजी-माजी प्राचार्य हे उपस्थित होते.

मुलींच्या आयटीआयला विभागीय स्तरावरील पुरस्कार

विभागीय उत्कृष्ट आयटीआय म्हणून औरंगाबादच्या मुलींच्या शासकीय आयटीआयला 1 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन प्राचार्य नंदकिशोर आहेरकर यांना गौरवण्यात आले. राष्ट्रीय कौशल्याचार्य पुरस्कार विजेच्या आयटीआय शिक्षकांना राज्य शासनामार्फत 1 लाख रुपयांचा परुस्कार देण्याचे मंत्री नवाब मलिक यांनी जाहिर केले.

इतर बातम्या-

सिडको वाळूज महानगराचे औरंगाबाद महापालिका हस्तांतरण कामाला वेग, सुविधांचे होणार संयुक्त सर्वेक्षण

औरंगाबाद विमानतळावरही खासगीकरणाचे वारे, सोयी- सुविधा, प्रवासी संख्येची सविस्तर माहिती मागवली

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.