AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद शहरात लाईट हाऊस प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद, सहा महिन्यात 150 पेक्षा जास्त युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण

मार्च 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत या प्रकल्पासाठी एकूण 202 जणांनी फाउंडेशन अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. तर 157 जणांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. फाउंडेशन कौशल्य अभ्यासक्रमासाठी 175 जणांनी नोंदणी केली आहे.

औरंगाबाद शहरात लाईट हाऊस प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद, सहा महिन्यात 150 पेक्षा जास्त युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण
लाइट हाऊस प्रकल्पाअंतर्गत प्रशिक्षण घेणारे औरंगाबादमधील युवक
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 5:55 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी (Aurangabad smart city), लाईट हाऊस फाउंडेशन (Lighthouse foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने लाईट हाऊस प्रकल्प राबविण्यात येत आहे. शहरात या प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लाईटहाउस म्हणजेच कौशल्य विकास केंद्र. या प्रकल्पाच्या माध्यमातून व्यावसायिक कोर्सचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते आणि गरजू तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे शहरातील तरुण वर्गासाठी शिक्षण आणि नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. महानगरपालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी औरंगाबादचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय (Asti kumarPandey) यांच्या मार्गदर्शनाखाली हा लाईटहाऊस प्रकल्प राबविण्यात येत आहे. स्टरलाईट टेक्नॉलॉजी या कंपनीने या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य केले आहे. स्मार्ट सिटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे व मनपाच्या उपायुक्त अपर्णा थेटे ह्यांचा देखरेखीखाली हे प्रकल्प राबवला जात आहे.

157 युवकांनी पूर्ण केला अभ्यासक्रम

मार्च 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत या प्रकल्पासाठी एकूण 202 जणांनी फाउंडेशन अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. तर 157 जणांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. फाउंडेशन कौशल्य अभ्यासक्रमासाठी 175 जणांनी नोंदणी केली आहे. लाईटहाऊसच्या व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमासाठी 90 जणांनी नोंदणी केली आहे. तर या सर्वातून 17 विद्यार्थांना रोजगार मिळाला आहे.

कोणत्या कामांचे प्रशिक्षण?

एसी आणि दुरुस्ती, अमेझॉन वेब सेवा, ब्युटी केअर, डिजिटल मार्केटिंग, इलेक्ट्रीशियन, आर्थिक लेखा आणि टॅली, फुल स्टॅक डेव्हलपर, जनरल ड्युटी असिस्टंट, ग्राफिक डिझायनिंग, हॉस्पिटल फ्रंट ऑफिस आणि बिलिंग एक्झिक्युटिव्ह, मल्टी स्किलिंग आणि टेक्नॉलॉजी, ऑफिस अॅडमिनिस्ट्रेशन, पायथन, टेलरिंग अद्ययावत आणि मूलभूत या उपक्रमांचा यात समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी एकूण 90 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आंबेडकर नगर येथे लाईट हाऊस तर्फे मेगा आऊट रीच चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दोन दिवसात तब्बल 250 जणांनी चौकशी केली होती. शहरातील रमानगर, मिसारवाडी, पदमपुरा, राजाबाजार, गणेश कॉलनी, हर्सूल, नागसेन नगर, नंदनवन कॉलनी, पहाडसिंगपुरा या भागात लाईट हाऊस प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या प्रशिक्षण केंद्रात एकूण 95 प्रशिक्षणार्थी आहेत. शहरातील वेदांत नगर, श्रेय नगर, नाथ सुपर मार्केट, औरंगपुरा या भागात लाईटहाऊस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

इतर बातम्या-

दोन डोस नसतील तर गुरुजींना पगारही नाही, औरंगाबाद जिल्हा परिषदेचा इशारा, प्रमाणपत्र अनिवार्य

मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी राज्यानेही भार उचलावा, रावसाहेब दानवे यांचे आवाहन, औरंगाबादेत महत्त्वाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.