AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादः पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप, पत्नीने दिला होता मृत्यूपूर्व जबाब

या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपी प्रभाकर लोखंडे यास आजीवन कारावास व 10 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 6 महिले साधी कैद तसेच पत्नीचा छळ केल्याप्करणी 3 वर्षे कारावासाची शिक्षा व 2 हजारांचा दंड, दंड न भरल्यास 1 मिहना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

औरंगाबादः पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप, पत्नीने दिला होता मृत्यूपूर्व जबाब
पत्नीला जीवे मारल्याप्रकरणी पती दोषी, जन्मठेपेची शिक्षा
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 12:16 PM
Share

औरंगाबादः पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन रॉकेल टाकून तिला जाळून (Murder) मारल्याप्रकरणी प्रभाकर गंगाधर लोखंडे (गंगापूर) यास वैजापूर येथील (Aurangabad crime ) अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रभाकर लोखंडे याने पत्नी संगीता हिला पैशांच्या कारणावरून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन 17 मे 2017 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरातील किचनमध्ये मारहाण केली होती. तसेच खाली पाडून तिच्या अंगावर रॉकेल टाकून आगकाडी लावून दिली होती. हा सगळा घटनाक्रम पत्नी संगीता हिने मृत्यूपुर्वी नोंदवलेल्या जबाबात सांगितला होता.

वैजापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात खटला

या प्रकरणी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत, पोलीस अंमलदार फकीरचंद फडे यांनी आरोपीविरुद्ध दोषपत्र दाखल केले होते. सदर खटला वैजापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए. यांच्या कोर्टात चालला होता. या खटल्यात शासनाच्या वतीने सरकारी वकील एन.एस. जगताप यांनी काम पाहिले. त्यांना एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संघराज दाभाडे यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून मदत केली. या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपी प्रभाकर लोखंडे यास आजीवन कारावास व 10 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 6 महिले साधी कैद तसेच पत्नीचा छळ केल्याप्करणी 3 वर्षे कारावासाची शिक्षा व 2 हजारांचा दंड, दंड न भरल्यास 1 मिहना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

उसने पैसे मागितल्यावरून मारहाण

गुरुवारी 09 नोव्हेंबर रोजी घटलेल्या अन्य एका घटनेत उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून माय-लेकाने भाजीपाला विक्रेत्या पती-पत्नीस मारहाण केल्याची घटना घडली. भारत भिवलाल घारदे- जोगेश्वरी, हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. 9 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते घरासमोर भाजीपाल्याची गाडी भरत होते. यावेळी घराशेजारी राहणाऱ्या मीराबाई कोतकर यांना घारदे यांची पत्नी उमा यांनी उसने दिलेले पैसे मागितल्याने मीराबाई हिने त्यांना शिवीगाळ करून मारहाण सुरु केली. हे पाहून भारत त्यांना समजावण्यासाठी गेले असता मीराबाई व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर कोतकर याने भारत यांच्या डोक्यात दगड मारला. या प्रकरणी भारत घारदे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

औरंगाबादः अजिंठा लेणीत खासगी वाहनांना परवानगी, एसटी बससेवा संपामुळे ठप्पच, आतापर्यंत 30 कर्मचारी निलंबित

आधीच शाळा नाही, त्यात आत मनमानी सुट्ट्या, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्या वाढल्या, विद्यार्थ्यांचा विचार कधी?

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.