औरंगाबादकरांसाठी खुशखबर! बच्चे कंपनीचे लाडके सिद्धार्थ उद्यान, प्राणीसंग्रहालय आजपासून खुले

मागील वर्षा मार्च 2020 पासून कोरोना संसर्ग वाढल्यामुळे मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय असलेले सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद होते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हे उद्यान एक आकर्षण स्थळ आहे. येथील प्राणीसंग्रहालयातील 14 वाघ हे प्रमुख आकर्षण ठरतात.

औरंगाबादकरांसाठी खुशखबर! बच्चे कंपनीचे लाडके सिद्धार्थ उद्यान, प्राणीसंग्रहालय आजपासून खुले
प्रातिनिधिक चित्र
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 11:00 AM

औरंगाबादः कोरोनाच्या साथीमुळे सुमारे 19 महिन्यांपासून बंद असलेले सिद्धार्थ उद्यान (Siddharth Garden) आणि प्राणिसंग्रहालय 12 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारपासून खुले करण्यात येणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी येऊ घातलेल्या बालकदिनानिमित्त महापालिकेनी जणू औरंगाबादकर (Aurangabad tourism) बच्चे कंपनीसाठी हे जणू गिफ्ट दिले आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यापासून कुठे तरी फिरायला जाण्यासाठी आतुरलेली मुले सिद्धार्थ उद्यान बंद असल्याने नाराज होती. मात्र शुक्रवारपासून उद्यान आणि प्राणी संग्रहालय सुरु करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने (Municipal corporation) घेतला आहे.

मोठ्यांना दोन डोस अनिवार्य

सिद्धार्थ उद्यानात येणाऱ्या 18 वर्षांवरील नागरिकांना येथे प्रवेशाकरिता लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य आहे. तसेच लहान मुलांसह सर्वांना मास्क घालणे आवश्यक आहे, असे महानगरपालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले.

मार्च 2020 पासून उद्यान बंद

मागील वर्षा मार्च 2020 पासून कोरोना संसर्ग वाढल्यामुळे मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय असलेले सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद होते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हे उद्यान एक आकर्षण स्थळ आहे. येथील प्राणीसंग्रहालयातील 14 वाघ हे प्रमुख आकर्षण ठरतात.  उद्यानात आकर्षक पुतळे उभारून नवीन खेळणीही बसवण्यात आली आहे. तसेच प्राणीसंग्रहालयात वाघ, बिबट्या, तरस, नीलगाय, हरीण, मगर, शहामृग, वानर आदी प्राणी आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे महापालिकेने उद्यानात प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे.

महापालिकेने जारी केले नियम

– उद्यानात प्रवेश करणाऱ्या लहान मुलांसह प्रत्येक व्यक्तीला मास्क घालणे अनिवार्य आहे. – 12 नोव्हेंबरपासून सिद्धार्थ उद्यान आणि प्राणीसंग्रहालय असे दोन्हीही खुले आहे. – उद्यान सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत तसेच प्राणीसंग्रहालय सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुले राहील. – 18 वर्षांवरील व्यक्तींना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय आत प्रवेश मिळणार नाही.

इतर बातम्या-

आधीच शाळा नाही, त्यात आत मनमानी सुट्ट्या, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्या वाढल्या, विद्यार्थ्यांचा विचार कधी?

बनावट कागदपत्रांवर बारा कोटींचे कर्ज, लातूरच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल होणार!

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.