AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत चोरट्यांचीच दिवाळी, दहा घरे फोडली, एकट्या पुंडलिकनगरात पाच घरफोड्या

औरंगाबादः दिवाळीच्या काळात कडेकोट पोलीस बंदोबस्त (Aurangabad diwali ) ठेवू, गस्त घालू अशी आश्वासने देणाऱ्या पोलिसांवर (Theft in Aurangabad) चोरांनी मात केल्याचेच चित्र दिसले. दिवाळीच्या दरम्यान शहरात अनेक ठिकाणी चोरट्यांनी घरो फोडून डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील दहा घरांत चोरी झाली असून एकट्या पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या (Pundliknagar police station) हद्दीतच पाच घरे चोरट्यांनी फोडून […]

औरंगाबादेत चोरट्यांचीच दिवाळी, दहा घरे फोडली, एकट्या पुंडलिकनगरात पाच घरफोड्या
दिवाळीत औरंगाबादमध्ये दहा ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघड
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 2:39 PM
Share

औरंगाबादः दिवाळीच्या काळात कडेकोट पोलीस बंदोबस्त (Aurangabad diwali ) ठेवू, गस्त घालू अशी आश्वासने देणाऱ्या पोलिसांवर (Theft in Aurangabad) चोरांनी मात केल्याचेच चित्र दिसले. दिवाळीच्या दरम्यान शहरात अनेक ठिकाणी चोरट्यांनी घरो फोडून डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील दहा घरांत चोरी झाली असून एकट्या पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या (Pundliknagar police station) हद्दीतच पाच घरे चोरट्यांनी फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. यासह जवाहरनगर, उस्मानपुरा, बेगमपुरा, सिडकोतही चोरट्यांनी धुकाकूळ घातला. यावरून पोलिसांची गस्त कमी पडल्याचे दिसून आले.

गारखेड्यात चव्हाण यांचे घर फोडले

आनंद राजकुमार चव्हाण हे चार भावांसह गारखेडा परिसरात राहतात. दिवाळीनिमित्त ते वैजापूर येथे गेले होते. त्यांचे लहान बंधू अजय चव्हाण हे शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत घरी होते. त्यानंतर ते कुटुंबियांसह तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले. त्यानंतर चोरट्यांनी कुलूप तोडून 10 तोळ्यांचे चांदीचे पैंजण, 7 तोळ्यांचे चांदीचे कडे, 12 तोळ्यांचे बाजूबंद, दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, इत्यादी दागिन्यांसह 30 हजार रोकड लंपास केली. शनिवारी रात्री दहानंतर हे घर बंद होते. शनिवारी रात्री ही चोरी उघडकीस आल्यानंतर परिसरातील आणखी पाच घरे फोडल्याचे उघडकीस आले. एकट्या नवनाथनगरमध्ये पाच घरे फोडण्यात आली. तसेच भारत नगरात एक घर फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. या प्रकरणी पुंडलिकनगरात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक धनाजी आढाव करीत आहेत.

किलेअर्क आणि सिडकोमध्येही चोरट्यांचा धुमाकूळ

दिवाळीच्या काळात चोरांनी जवाबरनगर, उस्मानपुरा, बेगमपुरा आणि सिडको व वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतही डल्ला मारला. पोलिसांनी तीन ते चार वेळा लावलेली फोल ठरली. किलेअर्क परिसरातील फिरोज खान शरीफ खान पठाण हे 04 ऑक्टोबरला घराला कुलूप लावून कुटुंबियांसह सिल्लोडमध्ये गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडून डल्ला मारला. घरातील 20 हजार रुपये रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा 44 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केला.

सिडको, रेणुकामाता मंदिराजवळ चोरी

सिडको एन-9 परिसरातील रेणुकामाता मंदिराच्या पाठीमागे राहणारे अमित काकडे यांच्या घराचा कडी कोंडा तोडून चोरट्याने 35 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

बीडबायपास रोडवर सुरक्षरक्षकालाच लुटले

शहरातील बीडबायपास रोडवर 6 नोव्हेंबर रोजी बीड बायपास रोडवरील मराठा हॉटेलजवळ सुरक्षा रक्षकालाच दोघांनी मारहाण करीत लुटले. ड्युटी संपल्यावर दुचाकीने घराकडे जाणाऱ्या सुरक्षा रक्षकाला रिक्षातून आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी अडवून मारहाण केली. त्यांचा मोबाइल, रोकड आमि दुचाकी असा 63 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक श्रीकांत भराटे करीत आहेत.

इतर बातम्या-

अनधिकृत लिंकवर केवायसी अपडेट, दीड लाखांची फसवणूक, औरंगाबाद पोलिसांच्या तत्परतेने अर्ध्या तासात रक्क

जागेचं अधिग्रहणच नाही, तर कारवाई कसली करताय? औरंगाबादच्या सर्वात मोठ्या वादाचा Ground Report

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.