मैदानात चिखलच चिखल… सर्वत्र पाणीच पाणी…; मनोज जरांगे यांच्या सभेवर पावसाचं सावट?

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेवर पावसाचं सावट आहे. जालन्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला. गेल्या 9 तासांपासून जालन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची सभा होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सभेपूर्वी मनोज जरांगे यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे.

मैदानात चिखलच चिखल... सर्वत्र पाणीच पाणी...; मनोज जरांगे यांच्या सभेवर पावसाचं सावट?
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 9:51 AM

अभिजीत पोते, दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 1 डिसेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांची जालना येथे आज सभा होणार आहे. या सभेसाठी 140 एकर जागा स्वच्छ करण्यात आली आहे. 140 एकरपैकी 100 एकर जागेवर ही सभा होणार आहे. तर पार्किंगसाठी 40 एकर जागा ठेवण्यात आली आहे. सभेपूर्वी जरांगे पाटील यांची जालना शहरातून भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर 130 जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. मात्र, जालन्यात जोरदार पाऊस झाला असला तरी जरांगे यांची सभा होणार असून या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा आजपासून सुरू होत आहे. या चौथ्या टप्प्याच्या दौऱ्याची सुरुवात जालन्यातून होत आहे. त्यामुळे जालन्यात जरांगे पाटील यांची सभा पार पडणार आहे. यावेळी जरांगे पाटील भाषणात काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ओबीसी समाजाच्याही राज्यभरात सभा होत आहे. या सभांनाही हजारोंचा प्रतिसाद मिळत आहे. स्वत: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे या सभांचं नेतृत्व करत आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यातील सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जालन्यात आज 750 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांसह एसआरपीएफच्या 3 तुकड्या देखील जालना शहरात तैनात आहेत. सभेच्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवलं जात आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खास खबरदारी घेतली आहे.

बाईक रॅली काढणार

या सभेच्या निमित्ताने संपूर्ण शहर जरांगेमय झालं आहे. जालना शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर जरांगे पाटील यांच्या स्वागताचे मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. जालन्यातील नवीन मोंढ्याजवळील पांजरापोळ मैदानावर ही सभा होत आहे. या सभेपूर्वी बाईक रॅली काढून जालन्यात मराठा समाजाचा शक्तिप्रदर्शन होणार आहे. त्यानंतर 130 जेसीबीच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे.

मैदानावर पाणीच पाणी

जालन्यात आज जोरदार पाऊस पडला. त्यामुळे सभास्थळाच्या ठिकाणी चिखल झाला आहे. पावसामुळे मैदानावर पाणीच पाणी झालं आहे. लोकांच्या बसण्याच्या ठिकाणीच पाणीच पाणी झालं आहे. मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणचे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम काढण्यात आले आहेत.

शाळांच्या सुट्टीचा आदेश रद्द

मनोज जरांगे यांच्या सभेनिमित्त जालना तालुका आणि शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून सुट्टी देण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी आदेश काढत ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.