औरंगाबादेत एक नाही तर दोन मेट्रो धावणार, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराडांनी घेतलेल्या बैठकीत काय घडामोडी?

औरंगाबादेत एक नाही तर दोन मेट्रो रेल्वे धावण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचे प्रयत्न सुरु आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी आधी प्राथमिक आराखडा आणि नंतर डीपीआर तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी दिली

औरंगाबादेत एक नाही तर दोन मेट्रो धावणार, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराडांनी घेतलेल्या बैठकीत काय घडामोडी?
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 9:45 AM

औरंगाबादः शहरातील बहुचर्चित अशा प्रस्तावित चिकलठाणा ते वाळूज अखंड पूलासोबतच या मार्गावर एक मेट्रो रेल्वे प्रकल्प साकारण्याची योजना महापालिकेने आखली होती. त्यासाठी स्मार्ट सिटीमार्फत प्रकल्प व्यवस्थापन संस्था नियुक्त करण्याचा निर्णयही झाला होता. मात्र औरंगाबादेत एक नाही तर दोन मेट्रो रेल्वे धावण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचे प्रयत्न सुरु आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी आधी प्राथमिक आराखडा आणि नंतर डीपीआर तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी मंगळवारी दिली.

कोणत्या दोन मार्गांवर मेट्रो?

1- शेंद्रा ते वाळूज-पंढरपूर या मार्गावर मेट्रो प्रकल्पा साकारण्याची महापालिकेची पूर्वीची योजना होती. केंद्रीय मंत्र्यांच्या प्लॅनमध्येही या मार्गाचा समावेश आहे. 2- बिडकीन ते हर्सूल या मार्गावरही मेट्रो रेल्वेचा प्रकल्पाची योजना असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

प्रकल्पासाठीची प्रक्रिया कुठवर आलीय?

केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी शहरात घेतलेल्या बैठकीत, शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांसाठीचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येणार असून नंतर डीपीआर तयार केला जाईल, असे डॉ. कराड यांनी सांगितले. रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. यासाठी महापालिका आणि महामेट्रो कंपनी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकाहीदेखील या बैठकीला उपस्थित होते. औरंगाबाद शहरात डबल डेकर पूल बनवून मेट्रोचे काम करावे, यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व नागरि विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे दिल्लीत प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.

या बैठकीला मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचे अतिरिक्त आयुक्त अरुण शिंदे, शहर मुख्य अभियंता सखाराम पानझडे, माजी नगरसेवक समीर राजूरकर यांच्यासह मेट्रोचे अतिरिक्त कार्यकारी व्यवस्थापक विकास नागुलकर, महामेट्रोचे सरव्यवस्थापक साकेत केळकर उपस्थित होते.

इतर बातम्या-

ऑनलाईन शिक्षणापेक्षा देशी दारु बरी ? नांदेडच्या विद्यार्थ्याचे थेट शिक्षणमंत्र्यांना पत्र, केली अजब मागणी

केंद्राच्या सोयीस्कर भूमिकेने नागरिकांचे ‘तेल’ काढले! भरमसाठ किंमती वाढविल्यानंतर खाद्यतेलाचे भाव 5 ते 20 रुपयांनी घसरल्याची फुशारकी

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.