AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Load shading | राज्यात कोळशाचा तुटवडा, भारनियमनाची दाट शक्यता, काय म्हणाले ऊर्जा मंत्री Nitin Raut?

कोयना धरणातून 17 दिवस पुरेल एवढीच वीजनिर्मिती होऊ शकते, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. ते म्हणाले, ' राज्यात कोळशाची टंचाई असतना हायड्रोपॉवर प्रकल्प असलेल्या कोयना धरणात 17 टीएमसी पाणी उपलब्ध आहे.

Maharashtra Load shading | राज्यात कोळशाचा तुटवडा, भारनियमनाची दाट शक्यता, काय म्हणाले ऊर्जा मंत्री Nitin Raut?
राज्यात कोळशाची टंचाई, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती Image Credit source: TV9 Marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 08, 2022 | 1:27 PM
Share

मुंबई | महाराष्ट्रात वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाची टंचाई (Coal Scarcity) निर्माण झाल्यामुळे भारनियमनाची शक्यता असल्याचे वक्तव्य ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केलं आहे. मात्र केंद्र सरकारच्या एका करारानुसार, सीजीपीएल कंपनीकडून महाराष्ट्र सरकार वीज विकत घेऊ शकेल, त्यामुळे शक्यतोवर सर्व प्रयत्न केले जातील. तसेच महाराष्ट्रावरचं लोड शेडिंगचं संकट टाळण्याचे प्रयत्न करू, असं आश्वासन नितीन राऊत यांनी दिलं आहे. राज्यात कोळशाचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक भागात अघोषित लोडशेडिंग सुरु आहे. उन्हाळा सुरु होताच लोडशेडिंग (Load shading) का केलं जातं, नेमके काय अडथळे येतात, या प्रश्नांची उत्तरं नितीन राऊत यांनी आज दिली. मुंबईत आज मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

उन्हाळ्यात लोडशेडिंगचं संकट का वाढतं?

उन्हाळ्यात तापमान वाढतं, तसं लोडशेडिंगचं संकट निर्माण होतं. यामागची सद्यस्थिती आणि कारणं सांगताना नितीन राऊत म्हणाले, ‘ कोळशाचा साठा मुबलक उपलब्ध नाही. त्यामुळे प्लांट चालवणं जिकिरीचं झालं आहे. त्याचंही व्यवस्थापन करावं लागत आहे. प्रत्येक प्लांट चालला पाहिजे, हा आमचा प्रयत्न चालला आहे. तिसरीकडे एखादे वेळी कोळसा उपलब्ध झाला तर रेल्वेचे रॅकही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे दररोज लागणारा कोळसा कमी पडतो. येणारा पावसाळ्यासाठीही आम्हाला कोळशाचा साठा संग्रहित करावा लागतो. तोदेखील साठवणं होत नाहीये. या सर्व कारणांमुळे जेव्हा उष्णांक वाढतो, तेव्हा ट्रान्सफॉर्मरही बंद पडण्याची भीती असते. अनेक ठिकाणी ते घडलेही आहे. त्यामुळे जेव्हा उष्णांक वाढतो, तेव्हा ट्रान्सफॉर्मरला कुलिंग द्यावी लागते. तेथे सबस्टेशनमध्ये आम्ही कुलर्स लावतो. एखादे वेळी पाण्याचा फवाराही मारावा लागतो. अशा वेळी वीज जास्त लागते आणि कधी कधी भारनियमन करावे लागते, असे मंत्री नितीन राऊत म्हणाले.

कोयना धरणात 17 टीएमसी पाणी

कोयना धरणातून 17 दिवस पुरेल एवढीच वीजनिर्मिती होऊ शकते, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. ते म्हणाले, ‘ राज्यात कोळशाची टंचाई असतना हायड्रोपॉवर प्रकल्प असलेल्या कोयना धरणात 17 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मागे आम्हाला जलसंपदा मंत्र्यांनी 10 टीएमसी पाणी वाढवून दिलं जातं. दररोजच्या वीजनिर्मितीसाठी 1 टीएमसी पाणी लागतं. म्हणजेच 17 दिवसाचाच साठा आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, पॉवर एक्सचेंजमधून जी वीज घेत असतो, त्याचे दर केंद्र सरकारने 12 रुपये फिक्स केले आहेत. त्यावर मर्यादा आहेत. परंतु वीज विकत घेताना 10 ते 12 रुपये दराने वीज मिळते. आज राज्यातले तसेच देशातील वीजनिर्मिती प्रकल्प अडचणीत आले आहेत. त्यामुळे वीज विकत घ्यायला गेलो तरीही वीज विकत मिळत नाही. त्यामुळे भारनियमन होण्याची संभावना वाढलेली असते. तरीही नागरिकांवर भारनियमनाचे संकट ओढवू नये, याची आम्ही पुरेपुर काळजी घेऊ, असे आश्वासन नितीन राऊत यांनी दिले.

इतर बातम्या-

Pushpa Song : पुष्पाचं परदेशी व्हर्जन!, सामी-सामी गाण्यावर पॅरिसमधल्या नागरिकांचा कमाल डान्स, पाहा व्हीडिओ…

Success Story : बाजारात विकेल तेच शेतामध्ये पिकेल, पांरपरिक पिकांना फाटा देत युवा शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रयोग

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार