Aurangabad Vaccination: पात्र असूनही लस न घेतलेल्यांना 15 दिवसाला 500 रुपये दंड, 15 डिसेंबरपासून धडक मोहीम!

जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या डोससाठी पात्र असूनही लसीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आता 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.

Aurangabad Vaccination: पात्र असूनही लस न घेतलेल्यांना 15 दिवसाला 500 रुपये दंड, 15 डिसेंबरपासून धडक मोहीम!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 10:41 AM

औरंदगाबादः जिल्ह्यातील लसीकरणाचे (Corona Vaccination) उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी नागरिकांना लसीकरणाची आणखी सक्ती केली आहे. ज्या लोकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांनी 15 डिसेंबरपर्यंत दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पात्र असूनही लस घेण्यास दिरंगाई करताना आढळल्यास अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

15 डिसेंबरनंतर धडक मोहीम!!

ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन 85 दिवस पूर्ण केले आहेत. मात्र दुसरा डोस घेणे बाकी आहे, अशा नागरिकांना दर 15 दिवसांनी 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. येत्या बुधवारपासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून या करावाईला सुरुवात होणार आहे.

आणखी कठोर नियम कोणते?

– जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणखी सक्तीचे आदेश दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे महाविद्यालय, कोचिंग क्लासेसमधील ज्या शिक्षकांनी लसीचे डोस घेतले आहेत, त्या शिक्षकांनी महिन्यातून एकदा कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. – तसेच लसीचा डोस न घेतलेल्या शिक्षकांना आठवड्याला कोरोना चाचणी करणे बंधनकारक असेल. – लसीकरणासाठी जिल्ह्यात मोबाइल व्हॅन पथकांची स्थापना करण्यात येणार आहे, हे पथक मागणीप्रमाणे घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करणार आहे. – लसीकरण न झालेल्या प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. – विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा स्कॉलरशिपसाठी अर्ज भरायचा असल्यास, तत्पूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे की नाही, याची खात्री करावी. – लसीकरण मोहिमेत बेफिकीरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागप्रमुखांनी तत्काळ कारवाई करावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

इतर बातम्या-

राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच औरंगाबाद मनसेत भूकंप! पदाधिकारी शिवसेनेत, देसाई म्हणतात मनसे म्हणजे गळकं घर!

Omicron : डेल्टा व्हेरिएंट आणि ओमिक्रॉनची काय स्थिती? काय म्हटलं मुंबई महापालिकेनं? वाचा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.