NEET Inspiring Story : शेतात 6 तास राबली, ना क्लास, ना कोचिंग, नीटची परीक्षा केली क्रॅक, शेतकऱ्याच्या पोरीची स्वप्नाला गवसणी

नांदेडमधील एका शेतकऱ्याची मुलगी नीटची परीक्षा घसघशीत मार्कांनी उत्तीर्ण झाली आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला तर ती डॉक्टर होणार आहे. पण खासगी वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला तर...

NEET Inspiring  Story : शेतात 6 तास राबली, ना क्लास, ना कोचिंग, नीटची परीक्षा केली क्रॅक, शेतकऱ्याच्या पोरीची स्वप्नाला गवसणी
Farmer's daughter Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 11:52 AM

नांदेड : मनात जिद्द आणि डोळ्यात स्वप्न असेल तर काहीही होऊ शकतं. इच्छाशक्ती असेल तर जगातील कोणताही अवघड टास्क सहज पूर्ण होतो. मग कितीही संकटं येवोत, अडथळे येवोत, त्याने काही फरक पडत नाही. टास्क पूर्ण होतोच होतो. नांदेडमधील शेतकऱ्याच्या पोरीने कोरोना काळातील हाहा:कार पाहिला. रुग्णांना वाचवताना डॉक्टरांनी घेतलेले परिश्रम पाहिले. त्यामुळे तिनेही डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं. घरी प्रचंड गरिबी होती. पण स्वप्नांपुढे काय गरिबी आणि काय श्रीमंती…? तिने स्वप्न पाहिलं अन् स्वप्नांचा पाठपुरावा सुरू केला. रोज सहा तास शेतात राबायची. त्यानंतर तिने घरी अभ्यास सुरू केला. नीटची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाली. आता ती डॉक्टर होतेय. केवळ जिद्दीमुळे तिचं स्वप्न साकार होतंय. शेतकऱ्याची पोर ही कामगिरी करू शकते. मग तुम्ही का नाही?

नांदेड जिल्हयातील कंधार तालक्यातील कंधारेवाडी या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी डॉक्टर होणार आहे. ज्योती कंधारे असं या मुलीचं नाव आहे. विशेष म्हणजे तिने शेतात काम करुन नीटची तयारी केली. कुठलीही शिकवणी न लावता पहिल्याच प्रयत्नात ती नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. अंकुश कंधारे यांना अडीच एकर जमीन आहे. त्यावरच कंधारे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. कंधारे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. मात्र, त्यावर मात करून ज्योतीने हे घवघवीत यश मिळवलं आहे.

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांना पाहून डॉक्टर बनायचं ठरवलं

ज्योतीचं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच शाळेत झाले. ज्योती इयत्ता दहावीत असताना कोरोनामुळे लॉकडाऊन लागला होता. संपूर्ण जगभरात हाहा:कार उडाला होता. लोकांचे जीव पटापटा जात होते. सर्वत्र भीतीचं वातावरण होतं. महामारीत लोकांचे जीव वाचवणारे डॉक्टर ती पाहत होती. ते पाहून आपल्याला देखील डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली, असं ज्योतीने सांगितलं.

720 पैकी 563 गुण

बारावी झाल्या नंतर तिने नीटची तयारी सुरू केली. गावात काही जणांनी नीटची परीक्षा दिली होती. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन ज्योतीने अभ्यास सुरू केला. यूट्यूवरील व्हिडियो पाहून देखील ती अभ्यास करायची. सकाळी शेतात जाऊन सहा तास काम करायची. शेतातच वेळ मिळेल तेव्हा काही तास अभ्यास करायची. त्यानंतर घरी आल्यावर पाच ते सहा तास अभ्यास करायची. तिला नीटच्या परीक्षेत 720 पैकी 563 गुण मिळाले. त्यामुळे तिचं स्वतःच आणि आई वडिलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

संकट अजूनही आहे

ज्योतीने नीट परीक्षेत घसघशीत यश मिळवलं आहे. तिला चांगले गुण मिळाले आहेत. पण तिच्यासमोरची संकटाची मालिका काही संपलेली नाहीये. सरकारी कोट्यातून नंबर लागला तरच ती डॉक्टर होऊ शकते. कारण चांगले गुण असूनही खासगी कॉलेजमध्ये शिकायची ज्योची आथिर्क ऐपत नाही. त्यामुळे आता तिला नव्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. तिला भविष्यात स्त्री रोग तज्ज्ञ व्हायचं आहे. तिला तुम्हीही मदत करू शकता. तिचे बँक डिटेल्स खाली आहेत.

jyoti kandhare

jyoti kandhare

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.