MNS Raj Thackeray: औरंगाबादेत उत्स्फूर्त जल्लोष, शहरात पाय ठेवताच राज ठाकरेंनी का मागितली माफी?

औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सोमवारी रात्री सुभेदारी विश्रामगृहावर गेल्यावर राज ठाकरे यांनी आधी कार्यकर्त्यांची माफी मागितील.

MNS Raj Thackeray: औरंगाबादेत उत्स्फूर्त जल्लोष, शहरात पाय ठेवताच राज ठाकरेंनी का मागितली माफी?
राज ठाकरे.
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 1:04 PM

औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. कोरोनाच्या लाटेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच औरंगाबादेत येत आहेत. या बैठकीकरिता सोमवारी संध्याकाळीच राज ठाकरे औरंगाबादेत दाखल झाले. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याची जय्यत तयारीही केली होती. ठरल्याप्रमाणे शनिवराी रात्री औरंगाबादेत महावीर चौकात त्यांचे ढोल, ताशांच्या गजरात स्वागत झाले. त्यानंतर ते मनसैनिकांच्या दुचाकी रॅलीबोसबत सुभेदारी विश्रामगृहाकडे निघाले. वाहनातून उतरून त्यांनी मनसैनिकांचे स्वागत स्वीकारले नाही.

याबद्दल मागितली माफी…

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो मनसे कार्यकर्ते महावीर चौकात उभे होते. त्यांचे स्वागत स्वीकारण्याऐवजी राज ठाकरे यांनी थेट विश्रामगृहाचा मार्ग धरला. याकरिता विश्रामगृहात पोहोचल्याबरोबर आधी त्यांनी कार्यकर्त्यांची माफी मागितली. राज ठाकरे म्हणाले, ‘काही महिन्यांपूर्वी माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याचे काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन झाले. डॉक्टरांनी आणखी काही काळ विश्रांती घ्यायला सांगितले आहे. त्यामुळे वैजापूर, गंगापूर, आणि औरंगाबादमध्येही येताना कारमधून खाली उतरून मी तुमचा सत्कार स्वीकारू शकलो नाही. ‘

महापालिका निवडणुकीसाठी रणनिती आखणार?

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सामना करण्याकरिता औरंगाबादमध्ये मनसे भाजपसोबत युती करणार का, की स्वबळावर लढणार या प्रश्नाचे उत्तरही आज मिळण्याची शक्यता आहे. तसेच पदाधिकारांमध्येही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, राज ठाकरे यांनी उद्याचा कार्यक्रम राजकीय नसून संघटनेचा आहे. कार्यकर्त्यांनीही संघटना बांधणीकडे लक्ष द्यावे, असे कालच्या संवादात म्हटले.

इतर बातम्या-

MLC Election: तीन वेळा आमदारकी, पण यावेळेस भाजपनं करेक्ट कार्यक्रम केला? अकोल्यात शिवसेनेचं नेमकं कुठं चुकलं?

Janhvi Kapoor | ‘सोने का रंग है, शीशे का अंग है…’, जान्हवीच्या हॉट अदांनी सोशल मीडियावर आग!

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.