आता होऊ द्या दिवाळीची खरेदी , सोन्या-चांदीचे भाव वाढीकडे, वाचा औरंगाबादचे भाव

21 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमधील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 47300 रुपये प्रति तोळा एवढा नोंदला गेला. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 48,500 रुपये प्रति तोळा एवढा नोंदला गेला. सराफा बाजारात आज एक किलो शुद्ध चांदीचा भाव 67,500 रुपये एवढा नोंदला.

आता होऊ द्या दिवाळीची खरेदी , सोन्या-चांदीचे भाव वाढीकडे, वाचा औरंगाबादचे भाव
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः दसऱ्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात (Gold-silver price) दररोज काही अंशी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जागतिक बाजारात सकारात्मक संकेत दिसून आल्याने सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. नवरात्र आणि दसऱ्यादरम्यान सोने-चांदीचे दर काहीसे स्थिर आणि कमी दरांवर होते. मात्र आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ होण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहे. म्हणूनच, गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने ज्यांना सोने-चांदी (Investment in Gold) खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी ही संधी असल्याचा सल्ला देण्यात येत आहे.

औरंगाबादमध्ये काय आहेत दर?

21 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमधील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 47300 रुपये प्रति तोळा एवढा नोंदला गेला. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 48,500 रुपये प्रति तोळा एवढा नोंदला गेला. सराफा बाजारात आज एक किलो शुद्ध चांदीचा भाव 67,500 रुपये एवढा नोंदला गेल्याची माहिती, औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलीक यांनी दिली.

का वाढतायत सोन्याचे भाव?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलरच्या कमकुवतपणामुळे सोन्याचे भाव जास्त किमतीत व्यापार करत आहेत. आज कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीत वाढ झाली. त्याचबरोबर अमेरिकन बॉण्ड उत्पन्नात घट झाल्याचा परिणामही सोन्याच्या किमती वाढल्याच्या रूपात दिसून आला.

Gold ETF गुंतवणुकीत वाढ

सप्टेंबरमध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मध्ये 446 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. देशातील सणांचा हंगाम पाहता जोरदार मागणीमुळे गुंतवणुकीचा हा ओघ आत्तापर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे. गोल्ड ईटीएफ श्रेणीमध्ये आतापर्यंत 3,515 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक प्राप्त झाली आहे.

देशात सोन्याची एकसमान रचना

बाजार नियामक सेबीने बुधवारी गोल्ड एक्सचेंज उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचा व्यापार इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (पावती) अर्थात ईजीआरद्वारे केला जाईल. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (EGR) कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा नवीन स्टॉक एक्सचेंजमधून सुरू केली जाईल. सेबीच्या मंजुरीनंतरच हे ठरवले जाईल की, ईजीआरची किमान किंमत किती असेल. यानंतर शेअर बाजार EGR चे सोन्यात रूपांतर करू शकतील. सेबीच्या मते, गोल्ड एक्स्चेंजमध्ये EGR च्या ट्रेडिंग आणि फिजिकल सोन्याच्या डिलिव्हरीसाठी संपूर्ण इको-सिस्टम असेल आणि देशातील सोन्याच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता आणि निवड प्रदान करेल. ईजीआरच्या खरेदी आणि विक्रीसाठी गोल्ड एक्सचेंज हे राष्ट्रीय व्यासपीठ असेल. ईजीआरअंतर्गत मानक सोन्याचा व्यापार केला जाईल आणि देशभरात सोन्याची एकसमान किंमत रचना तयार करण्यात मदत होईल.

इतर बातम्या-

Gold-Silver Weekly Updates : या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ, सोन्याने केला 48 हजाराचा टप्पा पार

सोन्याची पुन्हा उसळी; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI