अंतरवलीत मोठ्या घडामोडी, संभाजी राजे थेट Manoj Jarange यांच्या भेटीला; आमरण उपोषणापूर्वीच खलबतं?

जालन्याच्या अंतरवली सराटीत पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील हे आजपासून आमरण उपोषण करत आहेत. त्यामुळे मराठा समाज अंतरवलीत एकवटला आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे...

अंतरवलीत मोठ्या घडामोडी, संभाजी राजे थेट Manoj Jarange यांच्या भेटीला; आमरण उपोषणापूर्वीच खलबतं?
sambhaji chhatrapatiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 25, 2023 | 9:05 AM

संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 25 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची डेडलाईन कालच संपली आहे. काल दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाची घोषणा केली नाही. उलट छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्याांना आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कधीपर्यंत देणार ते काहीच सांगितलं नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न अंधांतरीच लटकण्याची चिन्हे आहेत. असं असलं तरी मनोज जरांगे पाटील मात्र आमरण उपोषणावर ठाम आहेत. आजपासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे या उपोषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील हे आज अंतरवली सराटीत उपोषणाला बसणार आहेत. त्यांचं हे आमरण उपोषण सुरू असणार आहे. यावेळी अन्नपाणी आणि औषधेही घेणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच येत्या 28 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा सांगणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणापूर्वीच छत्रपती संभाजीराजे त्यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 12.30 वाजता संभाजीराजे आणि जरांगे पाटील यांची भेट होणार आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची खलबते होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संभाजीराजे पहिले नेते

मागच्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर त्यांना भेटायला जाणारे संभाजीराजे हे पहिले नेते होते. सर्वात आधी संभाजीराजे यांनी अंतरवलीत जाऊन जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. आज पुन्हा एकदा जरांगे पाटील उपोषणाला बसत आहेत. त्यामुळे संभाजीराजे त्यांची भेट घेणार असून यावेळीही जरांगे यांना भेटणारे संभाजीराजे हे पहिलेच नेते असणार आहेत.

गावगावात उपोषण

आजपासून मराठा समाजही उपोषण करणार आहे. गावागावातील सर्कलवर मराठा समाज जमणार असून त्या ठिकाणी साखळी उपोषण करणार आहे. त्यामुळे मराठा आंदोलन चिघळणार असल्याचं चित्र आहे. तसेच आजपासून मराठा आंदोलक गावागावात कँडलमार्चही काढणार आहेत. काही गावांनी तर राज्यातील सर्व पक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. अंतरवली सराटीतही आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात आली आहे. जे नेते वैधानिक पदावर नाहीत, अशा नेत्यांना मात्र गावात प्रवेश दिला जाणार आहे.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.