अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यात खडाजंगी, संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया
जे झालं ते काही भांडण नाही. विरोधी पक्षाचं काम आहे. आम्हाला जास्त निधी द्या, असं म्हणायचं. अंबादास दानवे हे आवाज वाढवून आणि उठून बोलत होते.

औरंगाबाद : येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाद झाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदपीन भुमरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. निधी वाटपावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चांगलेच सुनावले. विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. भूमरे यांची बाजू उचलून धरण्याचं काम बाजूला बसलेले अब्दुल सत्तार करत होते. यासंदर्भात बोलताना औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणाले, बैठकीत गोंधळ वैगेरे काही झाला नाही. आम्हाला निधी जास्त द्यावा, अशी अंबादास दानवे यांची मागणी होती. कुणीही अंगावर आले नाही. आम्ही सर्वांना समान निधी दिला आहे. विरोधी पक्षाचं काम त्यांनी केलं. माझ्या अंगावर कुणी आलं नाही. जे झालं ते काही भांडण नाही. विरोधी पक्षाचं काम आहे. आम्हाला जास्त निधी द्या, असं म्हणायचं. अंबादास दानवे हे आवाज वाढवून आणि उठून बोलत होते.
निधी देताना तालुक्याचा विचार केला
ठाकरे गटाला निधी देत नाही का, असा प्रश्न संदीपान भुमरे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना संदीपान भुमरे म्हणाले, निधी देताना तालुक्याचा विचार केला जातो. सगळ्या तालुक्यांना सारखा निधी दिला. ठाकरे गट, उदय राजपूत असा विषय नाही.
हे विरोधी पक्षनेत्याचे काम
आवाज वाढवून बोलणं हे विरोधी पक्षनेत्याचं कामच आहं. विरोधी पक्षनेत्याने आवाज वाढवला नाही, तर त्यांना विरोधी पक्षनेता कोण म्हणेल. कन्नड तालुक्याला जेवढा निधी दिला गेला तेवढा निधी वैजापूर, सिल्लोड, गंगापूर या सगळ्या तालुक्यांना दिला गेला आहे, असंही संदीपान भुमरे यांनी म्हंटलं.
गैरसमज झाला होता
बैठकीत उदय सिंह यांचा गैरसमज झाला होता, असं अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं. अंबादास दानवे यांनी त्यांच्या मतदारसंघातील निधीचे काही आकडे सांगितले. पालकमंत्र्यांनी तालुक्यानुसार किती निधी दिला हे सांगितलं. त्यानंतर अंबादास दानवे आणि उदय सिंह यांचे समाधान झाले.
