AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिस्तुल असती तर सहा गद्दारांना रांगेत उभं करून थेट… ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा संताप

ठाकरे गटातून ६ खासदार शिंदे गटात गेल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. नांदेडचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी गद्दारांना गोळ्या घालण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. ही फूट म्हणजे शिवसेनेवरील 'गद्दारीचा शाप' असून, उद्धव ठाकरेंनी मवाळ भूमिका सोडून कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

पिस्तुल असती तर सहा गद्दारांना रांगेत उभं करून थेट... ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा संताप
mahesh patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2026 | 5:19 PM
Share

ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत. सहाही खासदार शिंदे गटात जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सहा खासदारांनी पक्ष सोडल्याने शिवसैनिकांमध्ये संताप उसळला आहे. चार वर्षात दुसऱ्यांदा पक्ष फुटल्याने शिवसैनिकांचा संताप रस्त्यावर आला आहे. ठिकठिकाणी या फुटीर खासदारांविरोधात ठाकरे गटाने आंदोलन सुरू केलं आहे. अनेक ठिकाणी या फुटीर खासदारांचा निषेध नोंदवला जात आहे. ठाकरे गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या संतापाचा कडेलोट इतका झालाय की एका पदाधिकाऱ्याने तर माझ्याकडे बंदूक असती तर मी या सहाही खासदारांना गोळ्या घातल्या असत्या, असं म्हटलं आहे. यावरून ठाकरे गटातील संतापाची कल्पना येऊ शकते.

नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी हा संताप व्यक्त केला आहे. माझ्याकडे पिस्तूल असती तर या सहा गद्दारांना गोळ्या घातल्या असत्या, पण माझ्याकडे दुर्देवाने पिस्तूल नाही. पण माझ्यासमोर आले तर पायातला जोडा काढून थोबाडावर मारल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा संतप्त इशाराही महेश पाटील यांनी दिला आहे. ठाकरे सेनेत पुन्हा एकदा फूट पडल्याने कडवट शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. रस्त्यावर उतरून या सहा खासदारांच्या विरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. ठाकरे सेनेचे देगलूर चे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी तर अत्यंत आक्रमक पवित्रा घेत ज्यांना जायचे त्यांनी जा असे म्हणण्यापेक्षा गद्दारांना तुडवा, असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्यावेत, अशी विनंतीही केली आहे.

शिवसेनेला फुटाची श्राप

शिवसेनेला गद्दारीचा श्राप, पक्षफुटीचा श्राप शिवसेनेच्या स्थापनेपासून लागलेला आहे. असल्या फुटी शिवसेनेने अनेकदा पचवल्या आहेत. काल जे 6 गद्दार आई समान असलेल्या शिवसेनेच्या पाठीत वार करून गेले आहेत. ते अमित शहा, मोदी, एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या ध्येयधोरणाच्या विरोधात उद्धव साहेबांच्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये निवडून आले आहेत. या गद्दारांनी आई समान असलेल्या शिवसेनेच्या पाठीत वार करण्याचं काम केलं आहे. शिवसेना ही फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे. पुन्हा उभारी घेईल. ज्यांची औकात नव्हती, ज्यांना कुत्र विचारत नव्हतं असलेल्यांना शिवसेनेने घडविलेल आहे, असं पाटील म्हणाले.

साहेब आदेश द्या…

ते जे सहा मडके गेलेले आहेत. जय राम, श्रीराम, जय रामला गेलेले आहेत. गद्दारांना माफी नाही म्हणत आनंद दिघेंनी सजा दिली होती. तसंच या गद्दारांना एका रांगेमध्ये उभे टाकून गोळ्याने उडविलं पाहिजे. उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे, आपण मवाळ भूमिका घेऊ नका. ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, असं म्हणू नका. जे पक्ष सोडून जातील त्यांना जोड्याने हाणा, असे आदेशच शिवसैनिकांना द्या, असं आवाहन त्यांनी केलं.

मवाळ भूमिकेमुळेच…

मवाळ भूमिकेमुळेच ज्यांची लायकी नाहीये, ते शिवसेनेच्या पाठीत वार करत आहेत. अशा गद्दारांना धडा शिकविला पाहिजे. यांना एका रांगेत उभा टाकून गोळ्या घातल्या पाहिजेत. दुर्दैवाने माझ्यापाशी पिस्तूल नाही. माझ्यापाशी जर पिस्तुल असती तर आईची शपथ घेऊन सांगतो एका रांगेत उभा करून या सगळ्या साल्यांना गोळ्या घातल्या असत्या. ह्या गद्दाराच्या औलादी एका बापाच्या नाहीयेत. गद्दारांना येणाऱ्या काळात शिवसैनिक सळो की पळो करतील, असा इशारा त्यांनी दिला.

जोड्याने हाणल्याशिवाय…

पैसा पैसा काय करीत आहात तुम्ही? पैसे किती दिवस पुरणार आहे? पण गद्दारीचा शिक्का मरेपर्यंत आणि मेल्यानंतर सुद्धा तुमच्या माथी राहणार आहे. हिटलरची हिटलरशाही टिकली नाही तर मोदीशाही, अमित शाही, शिंदेशाही किती दिवस टिकणार आहे? येणारा काळ तुम्हाला सळो की पळो करून सोडणारा आहे. लग्न कार्यात, मौतीत, तुम्ही जिथं भेटाल तिथ तुम्हाला लोक जोड्याने हाणल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले