औरंगाबाद: शहागंजमधील बालाजी धर्मशाळेत जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या गणपतीची स्थापना, 13, 14 तारखेला महालक्ष्मी देखाव्यांची ऑनलाइन स्पर्धा

उत्सव समितीच्या वतीने 13 आणि 14 सप्टेंबर रोजी ऑनलाइन महालक्ष्मी देखाव्यांकरिता स्पर्धा घेण्यात येणार आहे. बुधवारी 15 सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागात वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी 16 रोजी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद: शहागंजमधील बालाजी धर्मशाळेत जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या गणपतीची स्थापना, 13, 14 तारखेला महालक्ष्मी देखाव्यांची ऑनलाइन स्पर्धा
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद: दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील औरंगाबादमधील जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या (Shri Ganesh Mahasangh Utsav Samiti, Aurangabad) वतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शुक्रवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी शहागंज येथील बालाजी धर्मशाळा येथील श्री गणेश महासंघाच्या संपर्क कार्यालयात गणपतीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. कोरोनाविषय शासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करून हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देशमुख  (Abhishek Deshmukh)यांनी सांगितले.

शहरातील मान्यवरांची उपस्थिती

या गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री, डॉ.भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच औरंगाबादा जिल्हा श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार हेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी दिली.

महालक्ष्मी देखाव्यांची ऑनलाइन स्पर्धा

यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिकरित्या एकत्रित येऊन विविध स्पर्धांचे आयोजन करणे टाळण्यात आले आहे. मात्र गर्दीला फाटा देत काही ऑनलाइन स्पर्धा आणि काही सार्वजनिक उपक्रम राबवण्याचे श्री गणेश महासंघ उत्सव समितीने नियोजन केले आहे. त्यानुसार 13 आणि 14 सप्टेंबर रोजी ऑनलाइन महालक्ष्मी देखाव्यांकरिता स्पर्धा घेण्यात येणार आहे. बुधवारी 15 सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागात वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी 16 रोजी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी केले आहे. शनिवारी 18 सप्टेंबर रोजी कोविडमुळे मयत झालेल्या पालकांच्या पाल्यांना सामाजिक भावनेतून शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

19 सप्टेंबर रोजी रविवारी जागेवर विसर्जन

यंदा कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळांना गणपतीची प्रतिष्ठापना किंवा विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक काढण्याची परवानगी नाही. त्यामुळे सप्टेंबर रोजी कोणतीही मिरवणूक न काढता श्रींच्या मूर्तीची जागेवरच विसर्जन मिरवणूक होणार असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली. (Shri Ganesh Mahasangh Utsav Samiti Ganesh Festival starts in Shahaganj, Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या- 

Ganesh Chaturthi 2021 | गणेश चतुर्थी आज, जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2021 | महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आज आगमन, भाविकांमध्ये मोठा उत्साह

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI