Aurangabad: एकाच दोरीने एकाच झाडाला गळफास, अल्पवयीन मुलगी व तरुणाच्या आत्महत्येने सिल्लोडमध्ये खळबळ

सिल्लोडमध्ये एकाच झाडाला एकाच दोरीच्या सहाय्याने तरुण आणि अल्पवयीन मुलीने घेतला गळफास. अजिंठा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी उघडकीस आली आत्महत्या.

Aurangabad: एकाच दोरीने एकाच झाडाला गळफास, अल्पवयीन मुलगी व तरुणाच्या आत्महत्येने सिल्लोडमध्ये खळबळ
सिल्लोडमध्ये तरुण-तरुणीची आत्महत्या
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 5:48 PM

औरंगाबादः सिल्लोड येथील एका अल्पवयीन मुलीने आणि तरुणाने एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास (Suicide case) घेतल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आल्यावर परिसरात खळबळ माजली.  औरंगाबादमधील (Aurangabad Police) अजिंठा पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

लिंबाच्या झाडाला गळफास

सदर प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि अल्पवयीन मुलगी हे दोघेही जळकीबाजार येथील रहिवासी होते. अल्पवयीन मुलगी आणि गावातील तरुण हे दोघेही सोमवारी सकाळी शेताकडे गेले. शेतात शरद व राजनंदनी यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन सोबतच आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

अजिंठा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन

सदर घटनेची माहिती ग्रामस्थांनी अजिंठा पोलीस ठाण्यात दिली. ही माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, फौजदार राजू राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास चौधरी, बाबा चव्हाण, संदीप जाधव, राम माळी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृतांच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीनुसार, सदर मृत्यूची नोंद करण्यात आली.

इतर बातम्या-

Breaking : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता, शरद पवारांच्या अनिल परबांना कोणत्या महत्वाच्या सूचना?

हातात धान कापणीचं अवजार अन् समोर डरकाळी फोडणारा वाघ, गडचिरोलीत 44 वर्षांच्या वाघिणीची यशस्वी झुंज!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.