Aurangabad: वैजापूर नगरपंचायत समितीच्या इमारतीला लोकनेते आर.एम. वाणी यांचे नाव, सहा महिन्यात पुतळा उभारणार

नगरपालिकेच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य बजावणारे लोकनेते आर एम वाणी यांचा पुतळा स्सथापन करण्याचा ठराव मंजूर केला आहे. येत्या सहा महिन्यात शहरातील मध्यवर्ती भागात पुतळा बसवण्यात येईल, असे आश्वासन भाजपचे दिनेश परदेशी यांनी दिले.

Aurangabad: वैजापूर नगरपंचायत समितीच्या इमारतीला लोकनेते आर.एम. वाणी यांचे नाव, सहा महिन्यात पुतळा उभारणार
वैजापूर नगरपंचायत समिती इमारतीचा नामांतर कार्यक्रम
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 2:59 PM

औरंगाबादः वैजापूर नगर पंचायत समितीच्या (Vaijapur Nagar Panchayat) इमारतीला दिवंगत लोकनेते आर. एम. वाणी (R M Vani) साहेब प्रशासकीय भवन असे नाव देण्यात आले आहे. आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते हा नामविस्तार झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुभाष झांबड (Subhash Zambad), भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, येत्या सहा महिन्यात शहरातील मध्यवर्ती भागात पुतळा बसवण्यात येईल, असे आश्वासन भाजपचे दिनेश परदेशी यांनी दिले.

‘वैजापुरात लोकनेता वाणी यांचा ठसा’

या प्रसंगी बोलताना आमदार रमेश बोरनारे यांनी लोकनेते आर. एम. वाणी साहेब हे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्वाचे मार्गदर्शक नेतृत्व होते. पालिकेचे नगराध्यक्ष ते आमदार अशा प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत त्यांनी शेती, सिंचन, कृषी, सहकार आदीसह विविध क्षेत्रात तालुका पातळीवर भरीव विकासकामे पूर्ण केली. राज्य सरकारकडून कोणतेही अर्थसहाय्य न घेता त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण केलेल्या इमारतीला दिवंगत लोकनेते आर.एम. वाणी यांचे नाव देण्याची पंचायत समितीती सर्व पक्षीय सदस्यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे.

‘सहा महिन्यात आर.एम. वाणी यांचा पुतळा उभारू’

नगरपालिकेच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य बजावणारे लोकनेते आर एम वाणी यांचा पुतळा स्सथापन करण्याचा ठराव मंजूर केला आहे. येत्या सहा महिन्यात शहरातील मध्यवर्ती भागात पुतळा बसवण्यात येईल, असे आश्वासन भाजपचे दिनेश परदेशी यांनी दिले.

‘सामान्यांच्या हितासाठी सदैव लढले- माजी आमदार चिकटगावकर

या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर म्हणाले, दिवंगत वाणी यांच्या राजकारणातील कर्तृत्व व नेतृत्व संपन्न आदर्श व्यक्तीमत्त्व होते. तालुक्यातील विकास प्रश्न, सामान्य माणसाच्या हितासाठी त्यांनी संघर्षाचा लढा दिला, असे सांगत आमदार रमेश बोरनारे यांना आमदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे चिकटगावकर यांनी सांगितले.

इतर बातम्या-

Trending बंगाली गाणं Kacha Badamवर एअर होस्टेसनं केला फ्लाइटमध्येच डान्स, Video Viral

Delhi Gang Rape | तिच्यावर बलात्कार केला जात होता आणि त्या 9 जणी तमाशा पाहत होत्या? दिल्ली सामूहिक बलात्काराचे धक्कादायक सत्य

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.