AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Schools | सोमवारपासून शहरातल्या पाचवी ते सातवीचेही वर्ग भरणार, महापालिकेचे शाळांसाठी काय नियम?

शुक्रवारी शहरात 179 तर ग्रामीण भागात 119 असे जिल्ह्यात केवळ 298 नवीन कोरोनाबाधित आढळले. शुक्रवारी घाटीत उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात केवळ 412 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Aurangabad Schools | सोमवारपासून शहरातल्या पाचवी ते सातवीचेही वर्ग भरणार, महापालिकेचे शाळांसाठी काय नियम?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Feb 05, 2022 | 4:19 PM
Share

औरंगाबादः शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची (Aurangabad District corona patients) संख्या आता नियंत्रणात येत असल्याने महापालिकेने (municipal corporation) टप्प्या-टप्प्याने शहरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यात शहरातील आठवी, नववी आणि अकरावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. आता पुढील आठवड्यात म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून पाचवी ते सातवीचे वर्ग सुरु होतील, असे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी याबद्दलचे लेखी आदेश काढले आहेत. मात्र शाळा सुरु करण्यापूर्वी 48 तासांपूर्वी सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांची कोविडची (RTPCR) चाचणी करणे बंधनकारक असेल, असेही महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी, असे आदेशही महापालिकेने दिले आहेत.

48 तासांपूर्वी शिक्षक व कर्मचाऱ्यांची RTPCR

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दोन आठवड्यांपूर्वी सातशे ते आठशेच्या घरात होती. त्यात आता मोठी घट झाली आहे. त्यामुळे प्रशासकांनी शहरात इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्गदेखील सुरु करण्यास मान्यता दिली आहे. तसेच शाळांसाठी काही नियमही सांगितले आहेत. – शाळा सुरु करण्यापूर्वी 48 तासांपूर्वी सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांची RTPCR चाचणी करणे बंधनकारक असेल, असेही महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी. – विद्यार्थ्यांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीची पर्याय निवडला असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या त्या पद्धतीने शिक्षण देण्यात यावे. – प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खासगी वाहन चालक, कंडक्टर, रिक्षाचालक यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. – विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार, शाळेत टप्प्या-टप्प्याने तसेच एक दिवसाआड बोलावण्यात यावे. – कोरोना नियमांच्या पालनासह शाळेत गर्दी टाळण्यासाठी पालकांना प्रवेश देण्यात येऊ नये. – एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थीच बसवण्यात यावेत, असे आदेशात नमूद कऱण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट

औरंगाबाद शहरात तसेच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. शुक्रवारी शहरात 179 तर ग्रामीण भागात 119 असे जिल्ह्यात केवळ 298 नवीन कोरोनाबाधित आढळले. शुक्रवारी घाटीत उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात केवळ 412 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

इतर बातम्या-

Tadoba Tiger | कोंडेगावात अवतरले वाघोबा; ग्रामस्थांनीच बदलला मार्ग, जंगलाबाहेर येण्याचे कारण काय?

Uric Acid : युरिक अ‍ॅसिडची समस्या त्रास देतेय? मग चुकूनही हे पदार्थ खाऊ नका! अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील

अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.