पोहण्याचा मोह जीवावर बेतला, औरंगाबादेत तिघांचा बुडून मृत्यू

भांगसीमाता गड परिसरात दोघांचा तर वेरुळ लेणी परिसरातील कुंडात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घटली.

पोहण्याचा मोह जीवावर बेतला, औरंगाबादेत तिघांचा बुडून मृत्यू
औरंगाबादमध्ये वेगवगेळ्या दोन घटनांत तिघांचा बुडून मृत्यू झाला.
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 1:45 PM

औरंगाबाद: जिल्ह्यातील भांगसीमाता गड परिसरात रविवारी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर एकाचा वेरुळ परिसरात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद येथील भांगसीमाता गड (Bhangsimata Gadh) परिसरात झालेल्या घटनेतील तरुणांना रस्त्यात लागलेल्या वाहत्या पाण्यात पोहण्याचा मोह झाला आणि त्यात त्यांनी पोहण्याचा निर्णय घेतला. पाण्याच्या प्रवाहाला वेग जास्त असल्याने या दोघांचाही मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत गारखेड्यातील तरुण मित्रांसोबत वेरूळच्या लेणी (Verul Caves) परिसरात गेला असताना तेथील कुंडात बुडून त्याचा मृत्यू झाला.

भांगसीमाता परिसरात दोघे बुडाले

वाळूज औद्योगिक परिसरातील खासगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे प्रल्हाद राम चव्हाण, त्यांच्या शेजारी राहणारे बाळू अप्पा पालवे (२८) व पालवे यांच्या पत्नीचा भाऊ नितीन रमेश गुंडाळे (१९) यांनी रविवारी सुटी असल्याने भांगसीमाता गडावर गेले होते. पालवे यांच्यासोबत त्यांचा तीन वर्षांच्या मुलगाही होता. गडावर दर्शन घेऊन तेथे बराच वेळ घालवल्यानंतर दुपारी चार वाजता ते गडावरून खाली उतरले. घरून जेवणाचा डबा आणल्याने गडाच्या पायथ्याशी असलेल्या शेतातील झाडाखाली या सर्वांनी जेवण केले. दुपारी पाच वाजेच्या सुमारास घराकडे ते सर्वजण परत निघाले असता वाटेत वंजारवाडी शिवारात मोठ्या प्रमाणावर साचलेले पाणी त्यांना दिसले. खळाळत्या पाण्याचा झरा पाहून प्रल्हाद व नितीनला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. सोबत तीन वर्षांचा मुलगा असल्याने बाळू यांनी काठावरच थांबण्याचा निर्णय घेतला. प्रल्हाद व नितीन पाण्यात उतरले. मात्र, पाहता पाहता दोघेही बुडू लागले. हे पाहून बाळू घाबरून गेले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. तोपर्यंत दोघेही बुडाले. या घटनेची माहिती कळताच दौलताबादचे सहायक फौजदार अजहर पटेल, बाजीराव पगारे, सुधीर गायकवाड तर अग्निशमन विभागाचे प्रसाद शिंदे, इसहाक शेख, दिनेश मुंगसे, दीपक गाडेकर, छगन सलामबाद, तुषार तौर, विजय कोथमिरे, अजय कोल्हे, जगदीश सलामबाद यांनी घटनास्थळी धाव घेतली. साडेसहाच्या सुमारास दोघांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढले. त्यानंतर घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

गारखेड्यातील तरुण वेरुळच्या कुंडात बुडाला

वेरूळ लेणीतील येळगंगा नदीवरील जोगेश्वरी मंदिरासमोरील कुंडात बुडून रविवारी औरंगाबादच्या तरुणाचा मृत्यू झाला. आर्यन विजयप्रताप सहानी (18) असे मृत तरुणाचे नाव असून तो गारखेड्यातील बाळकृष्णनगरात राहत होता. रविवारी लेणी बंद असतानाही औरंगाबाद येथील सहा मित्र या भागात फिरण्यास आले होते. लेणीचे प्रवेशद्वार बंद असल्याने त्यांनी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या बाजूने वेरूळ डोंगरावर प्रवेश केला. सुरक्षा रक्षकांनी मनाई केल्यानंतरही हे युवक डोंगर परिसरातून फिरत फिरत येळगंगा नदीच्या परिसरात गेले. तेथे जोगेश्वरी मंदिराच्या समोरील कुंडातील पाण्यात पोहण्यासाठी त्यांनी उड्या घेतल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आर्यन सहानी बुडू लागला. हे पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. वेरूळ लेणी सुरक्षाप्रमुख पी. के. शाहू, भारत कांचार, कर्मचारी शेख बशीर, योगेश राठोड, कैलास ठेंगडे, मसियोद्दीन शेखसह सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत आर्यनला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही. स्थानिक नागरिक, सुरक्षा रक्षक, अग्निशमन जवानांनी आर्यनला बाहेर काढून खुलताबाद आरोग्य केंद्रात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

इतर बातम्या- 

औरंगाबाद शहरात दोन देवींच्या मंदिरात कोरोना चाचणी, मोफत लसीकरणाचीही सोय, वाचा कुठे?

Aurangabad: जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे खुली, 10 ऑक्टोबरपासून सर्व वयोगटातील नागरिकांना प्रवेश

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.