Aurangabad Gold: सोनं आजही घसरणीवरच, पाच महिन्यातील निचांकी स्तर गाठला, जाणून घ्या शहरातले भाव

HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

Aurangabad Gold: सोनं आजही घसरणीवरच, पाच महिन्यातील निचांकी स्तर गाठला, जाणून घ्या शहरातले भाव
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण कायम.

औरंगाबाद: गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरांना लागलेली गळती अजूनही सुरुच आहे. आज शुक्रवारी सोन्याचे दर (Gold rate in Aurangabad) आणखी कोसळले. चांदीच्या दरातही चांगलीच घसरण झालेली दिसून आली. शेअर बाजार तेजीत असताना गुंतवणूकदार सोन्याकडे दुर्लक्ष करून विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक (Investment in Share Market) करतात. त्याद्वारेच अधिक परतावा मिळवतात, म्हणून सध्याच्या काळात सोन्याला मागणी कमी आहे. परिणामी सोने आणि चांदीचे दरही घसरत आहेत.

शहरातले सोने-चांदीचे दर काय?

औरंगाबाद शहरातील सोन्या-चांदीच्या दरात आजही चांगलीच घसरण दिसून आली. शहरातील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे दर 46,300 रुपये प्रति तोळा असे दिसून आले. कालच्या पेक्षा या दरात 300 रुपयांची घसरण दिसून आली. तर चांदीच्या दरातही घसरण झालेली दिसली. आज औरंगाबादच्या मार्केटमध्ये एक किलो शुद्ध चांदीचे दर 65,500 रुपये एवढे होते.

डिजिटल गोल्ड म्हणजे काय?

डिजिटल स्वरुपातील सोनं हे तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता. हे सोनं विक्रेत्याकडून इन्शुअर्ड व्हॉल्टसमध्ये संग्रहित केले जाते. तुम्ही अगदी स्मार्टफोनवरुनही डिजिटल गोल्डची खरेदी करु शकता. विशेष म्हणजे तुम्ही अगदी कमी प्रमाणात म्हणजे अगदी 100 रुपयांचे सोनेही विकत घेऊ शकता.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम वॉलेटकडून (PayTm) ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही पेमेंट वॉलेटच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करु शकता. एवढेच नव्हे तर तुम्ही ‘गुगल पे’वरुन या सोन्याची विक्रीही करू शकता.

दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे. (Todays gold silver rate in Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या- 

Sovereign Gold Bond scheme : स्वस्त सोने खरेदी करण्याची आज शेवटची संधी

गोल्ड बाँडसमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी RBI ची नवी सुविधा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI