AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Top 5: औरंगाबादकरांसाठी आजच्या महत्त्वाच्या पाच बातम्या, जाणून घ्या मोजक्या शब्दात

नाशिक व इतर पाणलोट परिसरात पाऊस झाल्याने सर्वात मोठे जायकवाडी धरण 60 टक्के भरले आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे, शहरातील रुग्णालयात ताप, झटके येणे, डेंग्यू, न्युमोनियासह इतर आजारांची लक्षणं बालकांमध्ये दिसून येत आहेत.

Aurangabad Top 5: औरंगाबादकरांसाठी आजच्या महत्त्वाच्या पाच बातम्या, जाणून घ्या मोजक्या शब्दात
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 1:13 PM
Share

औरंगाबाद: मराठवाड्याची राजधानी, देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ, ऐतिहासिक नगरी, उद्योग नगरी म्हणून ख्यात असलेलं औरंगाबाद शहर. हेच शहर आता स्मार्ट सिटी (Aurangabad smart city) म्हणूनही नावारुपाला येत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक घडामोडींवर माध्यमांचीही नजर असते. जाणून घेऊयात औरंगाबाद शहर आणि परिसरातील पाच महत्त्वाच्या बातम्या अर्थात Aurangabad Top 5 काय आहेत-

1. जायकवाडी धरण 60 टक्के भरलं

नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रातून होत असलेला विसर्ग आणि स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसासाठी जायकवाडी धरणात 32,521 क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. सोमवारी रात्री 8 वाजता झालेल्या नोंदीत धरणाचा जलसाठा 60 टक्के झाल्याचे कळते. अपेक्षित जलसाठा झाल्याने नाथसागरातून सिंचनासह पिण्यासाठी व औद्योगिक क्षेत्राला नियोजित पाणीपुरवठा केला जाईल, असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितल्याचे वृत्त दै. लोकमतमध्ये प्रकाशित झाले आहे.

२. कोरोना कमी पण डेंग्यू, न्यूमोनियाने वॉर्ड फुल्ल

मराठवाड्यासह औरंबाद शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ही सकारात्मक बाब असली तरीही डेंग्यू आणि न्युमोनियाची लक्षणं मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. शहरातील घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात अचानक रुग्णांची संख्या वाढून गेली आहे. ताप, झटके येणे, डेंग्यू, न्युमोनियासह इतर आजारांची लक्षणं बालकांमध्ये आहेत. या विभागात 33 खाटा असून प्रत्यक्षात रुग्ण भरती 58 झाली आहे. वारंवार होणारा वातावरण बदलामुळे डेंग्यू, चिकनगुनियाने डोके वर काढले आहे. शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्येही या तापेच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

3. कचरा प्रक्रियेवरून पुन्हा मनपाला नोटीस

राष्ट्रीय हरित लवाद अर्थात एनजीटीने औरंगाबाद महापालिकेला घनकचरा प्रकल्पातील कचरा प्रक्रियेच्या अत्यंत दयनीय अवस्थेबाबत फटकारले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात एमपीसीबीने बजावलेल्या नोटिसांना मनपा प्रशासन दाद देत नसल्याचे एनजीटीने म्हटले आहे. यापूर्वी खाम नदीच्या प्रदुषणावरून एनजीटीने महापालिकेला फटकारले होते. आता आठवडाभरातच कचरा प्रकल्पावरून मनपाला नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त दै. दिव्य मराठीत प्रकाशित झाले आहे. शहरात दररोज 450 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रियेसाठी नारेगाव, पडेगाव, हर्सूल, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथे प्रकल्प उभारण्यात आले आहे. मात्र मनपा तेथे प्रक्रिया न करता कचऱ्याची साठवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमी सूरज अजमेरा यांनी 30 ऑक्टोबर 2020 रोजी एनजीटीत दाखल केलेल्या याचिकेत आकडेवारीसह कचऱ्याची स्थिती मांडण्यात आली होती.

4. शिवसेना शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्र सुरु करणार

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचून स्थिती पडताळून पाहण्यात विमा कंपनी कमी पडत असल्याने ऑनलाइन तक्रारीऐवजी शतकऱ्यांकडून ऑफलाइन अर्ज घेऊन नुकसान भरपाईची नोंद घ्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील विविध गावात शिवसेना पिक विमा मदत केंद्र सुरु करणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच आमदार अंबादास दानवे यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. हे पंचनामे करण्यासाठी एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीने 150 समन्वयकांची नियुक्ती केली आहे. मात्र तक्रारींची संख्या जास्त असल्याने हे समन्वयक कमी पडत असल्याची तक्रार शिवसेनेने केली आहे.

5. घरोघरच्या महालक्ष्मींना आज भावपूर्ण निरोप

गणपती उत्सवाच्या काळात येणाऱ्या तीन दिवसांच्या महालक्ष्मी सणालाही मराठवाड्यात विशेष महत्त्व आहे. रविवारी शहरात घरोघरी ज्येष्ठा-कनिष्ठेच्या रुपात महालक्ष्मीचं वाजत-गाजत आगमन झालं. सोमवारी महालक्ष्मींना सोळ्या भाज्या, सोळा चटण्या, सोळा पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. आज म्हणजेच मंगळवारी महालक्ष्मींना भक्तांकडून भावपूर्ण निरोप दिला जाईल. गणपतीच्या काळात गौराईदेखील माहेरपणाला येतात, त्यासाठी तिचा भरगच्च थाट केला जातो. आज संध्याकाळी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमानंतर महालक्ष्मीना निरोप दिला जाईल. (Todays top 5 News in Aurangabad, Marathwada, Maharashtra)

इतर बातम्या- 

Aurangabad corona: जिल्ह्यात 20 नवे कोरोनाबाधित , आजवर 1 लाख 44 हजार 590 कोरोनामुक्त, 226 जणांवर उपचार सुरु

रोड सायकलिंग स्पर्धेसाठी साई अंबेची निवड, महाराष्ट्र संघात स्थान मिळवणारा औरंगाबादचा पहिलाच खेळाडू!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.