Aurangabad corona: जिल्ह्यात 20 नवे कोरोनाबाधित , आजवर 1 लाख 44 हजार 590 कोरोनामुक्त, 226 जणांवर उपचार सुरु

जिल्हा सामान्य रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण दाखल झालेला नाही. मात्र शहरातील खासगी रुग्णालयात जास्त कोरोना रुग्ण भरती झाल्याची माहिती हाती येत आहे.

Aurangabad corona: जिल्ह्यात 20 नवे कोरोनाबाधित , आजवर 1 लाख 44 हजार 590 कोरोनामुक्त, 226 जणांवर उपचार सुरु

औरंगाबाद: जिल्ह्यात आज 13 सप्टेंबर रोजी महानगरपालिका आणि ग्रामीण भागात मिळून 20 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. तर जिल्ह्यात आज 19 जणांना सुटी देण्यात आली. महानगरपालिकेच्या हद्दीत 7 जणांना तर ग्रामीण भागात 12 रुग्णांना सुटी देण्यात आली. औरंगाबाद महानगर पालिकेच्या क्षेत्रात आज 05 नव्या कोरोना रुग्णांची (corona patients today in Aurangabad ) नोंद झाली. यात राधास्वामी कॉलनीत एक, घाटी परिसरात एक आणि इतर भागात तीन अशा पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले. तर ग्रामीण भागातील चाचण्यांमध्ये औरंगाबादेत दोन, गंगापूरमध्ये पाच, वैजापूरमधछ्ये पाच तर पैठणमध्ये तीन नागरिकांना कोरोनाची लागण झाली.

आज दोघांचा मृत्यू

कोरोनामुळे आज 13 सप्टेंबर रोजी घाटी परिसरात दोघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. यात औरंगाबादमधील करंजखेडा जहांगीर येथील 74 वर्षीय महिला आणि कन्नड येथील 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आजवरचे एकूण कोरोनाबाधित

औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयाने दाखल केलेल्या नोंदणीनुसार, जिल्ह्यात एक लाख 44 हजार 590 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मिनी घाटीत आठवडाभरापासून कोरोना रुग्ण नाही

मागील आठवडाभरापासून कोरोना दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण दाखल झालेला नाही. मात्र शहरातील खासगी रुग्णालयात जास्त कोरोना रुग्ण भरती झाल्याची माहिती हाती येत आहे. पालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांत सध्या 70 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे मिनी घाटीत गेल्या आठवडाभरापासून उपचारासाठी एकही रुग्ण दाखल झाला नाही. पालिकेच्या मेल्ट्रॉन रुग्णालयातही रुग्णांची संख्या घटली आहे. मेल्ट्रॉनमध्ये सध्या केवळ 9 रुग्ण आहेत. तर घाटीत 8 रुग्ण असून खासगी रुग्णालयात 28 रुग्ण उपचार घेत आहेत.

इतर बातम्या- 

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा घट, सक्रिया रुग्णसंख्याही खाली

नाशिक जिल्ह्यात 820 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, 3 लाख 97 हजार 268 ठणठणीत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI