AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंजूर है, मंजूर है.. च्या यादीत अचानक 6 वर्षांपूर्वीचा प्रस्ताव आला अन् औरंगाबाद ZP महिला सदस्या आक्रमक झाल्या, काय घडलं?

सहा वर्षांपूर्वीच्या कार्यक्रमाच्या खर्चाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि महिला सदस्यांनी याला तीव्र आक्षेप घेतला. जिल्हा परिषदेत महिलांनी एकजूट दाखवत या प्रस्तावाला आक्षेपच घेतला नाही तर तो नामंजूरही केला.

मंजूर है, मंजूर है.. च्या यादीत अचानक 6 वर्षांपूर्वीचा प्रस्ताव आला अन् औरंगाबाद ZP महिला सदस्या आक्रमक झाल्या, काय घडलं?
औरंगाबाद जिल्हा परिषद
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 2:17 PM
Share

औरंगाबाद जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या काही दिवसात होत आहे. निवडणुकीसाठीच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अखेरची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. मात्र यात सहा वर्षांपूर्वीच्या कार्यक्रमाच्या खर्चाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि महिला सदस्यांनी याला तीव्र आक्षेप घेतला. जिल्हा परिषदेत महिलांनी एकजूट दाखवत या प्रस्तावाला आक्षेपच घेतला नाही तर तो नामंजूरही केला. हा विरोध कशा प्रकारे झाला, हेही वाचणे उत्सुकतेचे आहे.

काय घडलं नेमकं?

झालं असं की, शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. विद्यमान सभेचे कामकाज औपचारिक पद्धतीने व्हावे, असा प्रशासनाचा प्रयत्न होता. या सभेला उपाध्यक्ष एल जी गायकवाड, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, बांधकाम सभापती किशोर बलांडे, महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, सीईओ निलेश गटणे आदी उपस्थित होते. विषय पत्रिकेतील विषय संपल्यानंतर ऐनवेळचे विषय वाचले जाऊ लागले. सदस्य सचिव एकामागून एक विषयाचे वाचन करत होते. त्याला सदस्यांकडून मंजूर.. मंजूर असा प्रतिसाद दिला जात होता. या यादीतच अचानक विषयक्रमांक 10 – पंचायत राज समिती ऑक्टोबर 2015 करिता स्वागत समारंभासाठी झालेल्या खर्चास मान्यता मिळणेबाबत… असा होता. त्यावरही मंजूरी द्या असास आग्रह धरण्यात आला. सदस्यांचे लक्ष नाही, असा समज होता. मात्र महिलांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला. सहा वर्षांपूर्वीचा विषय आता कसा काय आला? हा प्रश्न हिंदवी खंडागळे, पुष्पा काळे यांनी उपस्थित केला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे हा प्रस्ताव रद्द झाला.

इतर बातम्या-

MSEC Scholarship Result Topper : पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा, अहमदनगरचा डंका, गुणवत्ता यादी जाहीर

ओव्हरटेक करताना स्कूटर घसरली, पुण्यात 20 वर्षीय तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.