AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी फसवलं? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्यानंतर आता बच्चू कडू यांनी देखील उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार करत मोठा दावा केला आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी फसवलं? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
बच्चू कडू यांचा ठाकरेंवर पलटवार Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 23, 2026 | 3:10 PM
Share

काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. मात्र बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं प्रहारचे पदाधिकारी नाराज आहेत, मराठवाड्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ‘मातोश्री’वर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.  आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता,  घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली, जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या,  कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा मला आनंद आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता बच्चू कडू यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? 

बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता, मात्र राज्यमंत्रिपद दिलं. माझ्याऐवजी गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच गोवाहाटीला जाताना देखील उद्धव ठाकरे यांना मी विचारलं होतं असंही ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंनीच उद्धव ठाकरेंसोबत माझी भेट घालून दिली होती असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

आमच्या मतांमुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले,  उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन आम्ही त्यांना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंनी आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता, संख्याबळासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हाला गळ घातली होती,  ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून मला मंत्री केलं.  उद्धव ठाकरेंनी दिव्यांग मंत्रालय दिलं नाही, त्यांनी माझ्याऐवजी गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. शिवसेना फुटल्याचं खापर माझ्यावर फोडू नका, असंही यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे माझ्याबद्दल जे काही बोलले ते मनापासून बोलले असं वाटत नाही. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं, मग आम्ही चूक केली असं म्हणणार का? असा सवालही यावेळी बच्चू कडू यांनी ठाकरेंना केला आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ