Balasaheb Thackeray Birth Anniversary : मी आधी मराठी आणि नंतर हिंदू… बाळासाहेब ठाकरेंचे धगधगते विचार, जे प्रत्येक मराठी माणसाने वाचायलाच हवे!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे १० धगधगते विचार जे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचा हुंकार भरतील. वाचा बाळासाहेबांचे रोखठोक विचार

Balasaheb Thackeray Birth Anniversary : आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही बाळासाहेबांचे नाव आदराने आणि तितक्याच अभिमानाने घेतले जाते. ज्या काळात मराठी माणूस आपल्याच मुंबईत हतबल झाला होता, त्या काळात बाळासाहेबांनी त्याला स्वतःच्या हक्कासाठी आणि अस्मितेसाठी लढायला शिकवले.
मराठी माणूस ही ओळख जगभर अभिमानाने मिरवण्यासाठी त्यांनी लाखो तरुणांच्या मनात स्वाभिमानाचा हुंकार भरला. आजही त्यांचे विचार ऐकले की प्रत्येक मराठी माणसाचा बाणा जागा होतो. आज आपण अशाच बाळासाहेबांच्या धगधगत्या विचारांवर नजर टाकणार आहोत, ज्यामुळे तुमच्यातील मराठी बाणा जागा होईल.
बाळासाहेब ठाकरेंचे रोखठोक विचार
- अन्याय करणे जितके पाप आहे, त्यापेक्षा तो सहन करणे हे मोठे पाप आहे – बाळासाहेब ठाकरे
- मी आधी मराठी आणि नंतर हिंदू आहे – बाळासाहेब ठाकरे
- लाचारी पत्करून जगण्यापेक्षा स्वाभिमानाने मरणे केव्हाही श्रेष्ठ – बाळासाहेब ठाकरे
- दुसऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यापेक्षा स्वतःची पाऊलवाट निर्माण करा – बाळासाहेब ठाकरे
- घाबरतो तो मरतो, जो लढतो तोच जगतो. वाघ व्हा, शेळ्या-मेंढ्यांसारखे जगू नका – बाळासाहेब ठाकरे
- केवळ नोकरीसाठी अर्ज घेऊन फिरू नका, तर नोकरी देणारे बना – बाळासाहेब ठाकरे
- माणूस विकला जातो, पण निष्ठा विकली जात नाही – बाळासाहेब ठाकरे
- दिलेला शब्द आणि मारलेली गोळी कधीही मागे घेता येत नाही – बाळासाहेब ठाकरे
- जिथे लोकशाही लंगडी पडते, तिथे मला ठोकशाहीच वापरावी लागते – बाळासाहेब ठाकरे
- जोपर्यंत मराठी माणूस एकजूट आहे, तोपर्यंत त्याला कोणीही हरवू शकत नाही – बाळासाहेब ठाकरे
- शिस्त नसेल तर संघटना शून्य आहे आणि निष्ठा नसेल तर माणूस शून्य आहे – बाळासाहेब ठाकरे
- ज्याला स्वतःची भाषा आणि संस्कृती जतन करता येत नाही, तो माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे – बाळासाहेब ठाकरे
- माझ्या कुंचल्याने आणि शब्दांनी मी नेहमीच अन्यायावर प्रहार केला आहे – बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेबांचे विचार मराठी अस्मितेचा महामंत्र
दरम्यान बाळासाहेबांचे हे विचार केवळ शब्द नसून, तो मराठी अस्मितेचा महामंत्र आहे. त्यांनी दिलेली ही विचारांची शिदोरी आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि स्वाभिमानाने जगण्याची ताकद देते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त या विचारांचे स्मरण करणे, हीच त्यांना खऱ्या अर्थाने दिलेली आदरांजली ठरेल.
