AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंजारा नेते संजय राठोडांच्या पाठिशी; षडयंत्र रचणाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंजारा समन्वय समितीकडून निवेदन पाठवण्यात येणार आहे. | Banjara Sanjay Rathod

बंजारा नेते संजय राठोडांच्या पाठिशी; षडयंत्र रचणाऱ्यांना दिला 'हा' इशारा
संजय राठोड
| Updated on: Feb 13, 2021 | 8:00 PM
Share

यवतमाळ: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात (Pooja Chavan suicide case) भाजपच्या नेत्यांनी रान उठवल्यामुळे शिवसेनेचे मंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड अडचणीत आले होते. मात्र, आता बंजारा समाज त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावला आहे. न्यायनिवाडा न करताच समाजातील नेत्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र आमचा समाज खपवून घेणार नाही, असा इशारा बंजारा नेत्यांकडून देण्यात आला. (Banjara community in Yavatmal supports Sanjay Rathod)

संजय राठोड यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांसंदर्भात शनिवारी यवतमाळमध्ये बंजारा समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी बंजारा नेत्यांनी संजय राठोड यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. आजच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंजारा समन्वय समितीकडून निवेदन पाठवण्यात येणार आहे. 15 तारखेला सेवालाल महाराज जयंतीनंतर प्रत्यक्ष निवेदन देण्यात येईल. तसेच गरज पडल्यास याविरोधात आंदोलन करण्याचीही आमची तयारी असल्याचे बंजारा समन्वय समितीचे नेते ना.म. जाधव यांनी सांगितले.

परळीत बंजारा समाजाची गुप्त बैठक

पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या आत्महत्येनंतर बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, परळीतील गुप्त ठिकाणी बंजारा समाजातील प्रमुख लोकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मोजकेच समाजबांधव उपस्थित आहेत. या बैठकीनंतर बंजारा समाज संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बंजारा समाजाने प्रतिकूल भूमिका घेतल्यास संजय राठोड यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होऊ शकते.

आता समाजानं एकजूट दाखवण्याची गरज

आज सकाळीच बंजारा समाजाचे नेते मनीष जाधव यांनी पूजाला न्याय मिळवून द्यायची मागणी केली होती. बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण हिचा पुण्यामध्ये उच्चभ्रू वसाहतीत संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तिला न्याय मिळवून देण्यासाठी बंजारा समाजाने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन शेतकरी नेते आणि विमुक्त घुमंतू जनजाती महासभा प्रदेशाध्यक्ष मनीष जाधव यांनी बंजारा समाजाला केले होते.

कर्तृत्वसंपन्न समजल्या जाणाऱ्या बड्या मंत्र्याचे नाव या प्रकरणात जोडले जात आहे. भालचंद्र नेमाडे यांनी बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले, त्यावेळी समाजाने एकजूट दाखवत आंदोलन केले. त्याप्रमाणेच आताही समाजानं एकजूट दाखवण्याची गरज आहे. कोणतेही राजकीय हेवेदावे न दाखविता न्यायासाठी समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे, अशी अपेक्षा मनीष जाधव यांनी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या:

फोटो स्टोरी: एक होती पूजा! टिकटॉक स्टार ते सामाजिक कार्यकर्ती!

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

संजय राठोडांबाबत मातोश्रीची कमालीची सावध भूमिका ; भेटीची वेळ मागूनही उद्धव ठाकरेंकडून होकार नाही?

(Banjara community in Yavatmal supports Sanjay Rathod)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.