AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar : एकदा बाहेर तो कायमचा बाहेर, दादा मोठ्या मनाचे होते, पण मी.. बघून बघून घेतलं, सुनेत्रा पवारांनी एकदाच सुनावलं

Sunetra Pawar : बारामतीमध्ये सध्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे दोन्ही पवारांनी आपली ताकद झोकून दिली आहे.

Sunetra Pawar : एकदा बाहेर तो कायमचा बाहेर, दादा मोठ्या मनाचे होते, पण मी.. बघून बघून घेतलं, सुनेत्रा पवारांनी एकदाच सुनावलं
Sunetra Pawar
| Updated on: Oct 07, 2026 | 3:57 PM
Share

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने बारामतीमधील राजकारण तापलं आहे. बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झालीय. पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ त्यांनी निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता बंडखोर पुरुषोत्तम जगताप यांना थेट इशारा दिला आहे. “आपल्या सर्वांचे संबंध चांगले आहेत. नंतर कोण जवळ येणार अशा अनेक अफवा आहेत.कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, एवढे लक्षात ठेवा.दादा खूप मोठ्या मनाचे होते दादांसारखी मी नाही” असा थेट इशाराच सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता पुरुषोत्तम जगताप यांना दिला आहे.

“अनेक चुकीच्या अफवा ऐकायला येत असून कारखान्याचा अध्यक्ष हा सर्वसमावेशक असेल. सर्वांच्या मर्जीनूसार अध्यक्षांची निवड केली जाईल. अध्यक्ष अगोदर ठरवलेला नाही. निवडणुकीच्या निकालानंतर कोण अध्यक्ष ते ठरवू” असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.

अजितदादा पवार पॅनलचा जाहीरनामा प्रकाशित

काल अजित पवार यांचे सुपत्र जय पवार यांच्याहस्ते बारामतीत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी पुरुषोत्तम जगताप यांना इशारा दिला आहे.

दादांच्या आवाजाचा व्हिडिओ

“मला जेव्हा आधी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई करणार का, असं विचारलेलं. तेव्हा मी नाही म्हटलेलं. फक्त त्यांना दादांचे नाव आणि फोटो वापरू नये एवढचं सांगितलं होतं. पण काल त्यांनी सुनेत्रा पवार यांचा व्हिडिओ वापरून ते त्यांच्या पॅनेलचा प्रचार करत आहेत.त्यामुळे आम्ही पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करणार आहोत” असं जय पवार यांनी सांगितलं. त्यांनी दादांच्या आवाजाचा व्हिडिओ केला आहे. त्यामुळे त्याबाबत ही कारवाई करणार असं जय पवार म्हणाले.

युगेंद्र पवार यांच्यावर या पॅनलची जबाबदारी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता तिरंगी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल उभं करण्यात आलं आहे. युगेंद्र पवार यांच्यावर या पॅनलची जबाबदारी आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता दोन्ही पवारांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे.

Follow Us
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण, CCTV फुटेज समोर
महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन...
महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन; हुतात्मा चौकात CM देवेंद्र फडणवीसांकडून अभिवादन
जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अन
Tukaram Mundhe : जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अनिवार्य...
DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
पंढरीत विठ्ठल नामाचा गजर! DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
Bharat Gogawale : अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर...
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा