21 दलितांना फोडून काढलंय, महिला IPS चा असंवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद

बीड : कोणताही आयपीएस अधिकारी यूपीएससी मार्फत घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा पास होऊन येतो, तेव्हा तो भारतीय राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेचा अभ्यास करुन येतो. पण हा सर्व अभ्यास केवळ परीक्षा पास होण्यापुरताच वापरला आणि नंतर हुकूमशाही केली तर हे समाजाचं दुर्दैवं ठरतं. खरं तर दलित हा शब्द वापरण्यास सरकारने बंदी घातलीय. पण सरकारचे अधिकारीच दलित […]

21 दलितांना फोडून काढलंय, महिला IPS चा असंवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

बीड : कोणताही आयपीएस अधिकारी यूपीएससी मार्फत घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा पास होऊन येतो, तेव्हा तो भारतीय राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेचा अभ्यास करुन येतो. पण हा सर्व अभ्यास केवळ परीक्षा पास होण्यापुरताच वापरला आणि नंतर हुकूमशाही केली तर हे समाजाचं दुर्दैवं ठरतं. खरं तर दलित हा शब्द वापरण्यास सरकारने बंदी घातलीय. पण सरकारचे अधिकारीच दलित शब्दावर एवढा जोर देत असतील तर हा शब्द वापरण्याशिवाय पर्याय नाही. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या महिला आयपीएस अधिकारी डीवाय एसपींचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्याने हे सर्व बोलण्यास भाग पाडलंय.

पोलीस दलातील एका आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या वादग्रस्त वक्तव्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे . गुन्हेगारासाठी कर्दनकाळ म्हणून ओळख असलेल्या त्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या या असंवेदनशील वक्तव्यामुळे पोलीस दलाची लक्तरे वेशीला टांगली आहेत.

कधी दबंग, तर कधी लेडी सिंघम अशी ओळख निर्माण करून पोलिसांचा खाक्या दाखवत गुन्हेगारासाठी कर्दनकाळ ठरलेल्या आयपीएस भाग्यश्री नवटक्के. सध्या त्यांच्याकडे माजलगावचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यभार आहे.  माजलगाव परिसरात या महिला पोलीस अधिकाऱ्याचा मोठा दबदबा आहे. वाळू तस्करांना तर या पोलीस अधिकाऱ्याने सळो की पळो करून सोडलंय. या महिला अधिकाऱ्याचे किस्से परिसरात मोठ्या हर्षाने ऐकायला मिळतात. मात्र या अधिकाऱ्याच्या एका वादग्रस्त वक्तव्याने राज्यातील लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे असंवेदनशील वक्तव्य उभ्या महाराष्ट्राच्या जातीय द्वेषात संघर्ष पेटविणारं आणि पुरोगामी महाराष्ट्रात दोन समाजात तेढ निर्माण करणारं हे वक्तव्य आहे. या सर्व प्रकारावर बोलण्यास भाग्यश्री सोनटक्के यांनी नकार दिलाय.

टीव्ही 9 मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही. मात्र सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल केला जातोय. जीन्स पॅन्ट आणि टीशर्ट परिधान करून एका सभागृहात खुर्चीवर बसून भाग्यश्री नवटक्के यांनी ही चर्चा केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यांच्या समोर बसलेले आरोपी आहेत, तर काही आरोपींचे सहकारी मित्र. मागील एका प्रकरणात अट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल होता. आरोपी सवर्ण होता. त्याला अटक करण्याऐवजी मदत कशी केली आणि दलितांना धडा कसा शिकवला हे सांगताना त्यांचं मोबाईलमध्ये चित्रीकरण होत होतं ते त्यांच्या लक्षात आलं नाही. महत्त्वाची सामाजिक जबाबदारी असलेल्या या आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या या वक्तव्याचे दलित समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय. भाग्यश्री नवटक्के यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी दलित नेते बाबुराव पोटभरे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांनी तब्बल 21 दलितांवर निष्ठर कारवाई करत अक्षरशः त्यांना फोडून काढल्याचं स्वतः कबूल केलंय. हे कृत्य करुन स्वतःच्या जातीसाठी किती मोठ कार्य करतेय असं आरोपींसमोर सांगताना वर्दीची नाही, निदान आपल्याकडे पुरोगामी महाराष्ट्रातील जबाबदारी आहे हे देखील त्या विसरल्या. “भाग्यश्री यांच्या या क्रूर वागण्याने त्या पीडित दलितांचे संपूर्ण आयुष्यच देशोधडीला लागले आहे.  त्यामुळे भाग्यश्री नवटक्के यांच्यावर कठोर कारवाई,” व्हावी अशी मागणी शिवसेनेनी केली आहे.

घटनेने अस्पृष्यता निवारण करतानाच सर्वांना समान अधिकार दिलाय. कायद्यांचं पालन होतंय का हे पाहणं आणि कायदा सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी पोलिसांची आहे. पण पोलीस, तेही आयपीएस स्तरावरील अधिकारी असं वागत असतील, तर या देशातील जातीभेद कसा संपेल हा प्रश्न आहे. त्यामुळे पोलीस या अशा अधिकाऱ्यांना आपल्या दलात सांभाळून संपूर्ण व्यवस्थेवर लोकांना बोलण्याची संधी देणार की या असंवेदनशील वक्तव्याची शिक्षा देणार याकडे लक्ष लागलंय.

(नोट – टीव्ही 9 मराठीने या व्हायरल व्हिडीओची सत्यता तपासलेली नाही. व्हिडीओत जे बोललं गेलंय, त्याच्या आधारावर सोशल मीडियातून दावा करण्यात आला आहे.)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.