AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बीडमध्ये आणखी 6 आरोपींविरोधात मकोका; पोलीस अ‍ॅक्शनमोडमध्ये

आता बीडमधील आणखी सहा जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, त्यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आलं असून, दोन फरार आहेत.

मोठी बातमी! बीडमध्ये आणखी 6 आरोपींविरोधात मकोका; पोलीस अ‍ॅक्शनमोडमध्ये
| Updated on: Jan 27, 2025 | 4:00 PM
Share

बीड जिल्ह्याच्या मस्सोजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या घटनेनंतर बीडसह राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणातील सात आरोपींवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. वाल्मिक कराडवर देखील मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे बीडमधूनच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे एका गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले गँगविरोधात देखील पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आहे.

अक्षय आठवले गँगच्या सहा जणांविरोधात मकोका लावण्यात आला आहे, एकूण सहा आरोपींविरोधात मकोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. सहापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन आरोपी फरार आहेत. या आरोपींना गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अक्षय आठवले, ओंकार सवाई, मनीष क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे, तर सनी आठवले सह अन्य एकजण फरार आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यात आला होता, त्यानंतर बीडमध्ये आता दुसऱ्यांदा या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

बीडमध्ये जुन्या वादात बदनामी झाल्याच्या रागातून घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला होता. विश्वास दादाराव डोंगरे असं या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. डोंगरे आणि आठवले यांच्यात जुना वाद आहे. यापूर्वी देखील आठवले आणि डोंगरे गटात जोरदार राडा झाला होता, दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर  अक्षय आठवले याने डोंगरे यांच्या घरात घुसून गोळीबार केला होता. यामध्ये  विश्वास दादाराव डोंगरे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली. आता त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, या प्रकरणातील दोन आरोपी अजूनही फरार आहेत.

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?