AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड शरण तरीही मस्साजोग ग्रामस्थांची जल समाधी, वर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन, मागणी तरी काय?

Massajog villagers' water samadhi movement : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आज वर्षाच्या अखेरच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या. वाल्मिक कराड शरण आला. तरीही मस्साजोग ग्रामस्थांची जल समाधी आंदोलनाच्या तयारीत आहेत.

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड शरण तरीही मस्साजोग ग्रामस्थांची जल समाधी, वर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन, मागणी तरी काय?
मस्साजोग ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन
| Updated on: Dec 31, 2024 | 4:06 PM
Share

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. 22 दिवसानंतर आज वर्षाच्या अखेरच्या दिवशी वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात शरण आला. या खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी स्वतःच्या वाहनातून सीआयडी कार्यालयात पोहचला. पुण्यातील सीआयडी कार्यालयात कराड स्वतः हजर झाला. त्यामुळे या प्रकरणातील मोठी मागणी पूर्ण झाली. तरीही मस्साजोगचे सरपंच उद्या जलसमाधी आंदोलन करणार आहेत. नवीन वर्षाचे स्वागतच ग्रामस्थ त्यांच्या आंदोलनाने करणार आहेत. 1 जानेवारी 2025 रोजी जलसमाधी आंदोलनाचा निर्णय मस्साजोग ग्रामस्थांनी (Beed Massajog Villagers Water Samadhi Movement) घेतला आहे.

वाल्मिक कराड ऑनलाईन न्यायालयीन सुनावणीत हजर

वाल्मिक कराड आज पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात स्वतःहून शरण आला. आज कराड हा सीआयडी कार्यालयात स्वतःहून हजर होणार असा दावा करण्यात येत होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच कराड सीआयडी कचेरीत हजर झाला. त्याची सध्या वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. तर केज न्यायालयात तो ऑनलाईन पद्धतीने सुनावणीला हजर असणार आहे.

कराड स्वतः सीआयडी कार्यालयात गेल्यावर सीआयडी आणि पोलिसांवर विरोधकांसह सत्ताधारी आमदार, नेत्यांनी चांगलेच तोंडसूख घेतले. गेल्या 22 दिवसांपासून यंत्रणेला न मिळून आलेला हा आरोपी स्वतःच्या वाहनातून हजर झाला. त्यावरून हे सीआयडीचे मोठे अपयश असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

त्यांना त्यांचं राजकारण लखलाभ

या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पोलिसांचा तपास सुरू असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत तोपर्यंत पोलीस कारवाई करतील, असे मोठं विधान त्यांनी केले. बीडच्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. अतिशय कडक कारवाई केली जाईल. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही. यात तपास अतिशय गतीने करण्यात आल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात काही जणांना राजकारण महत्त्वाचं आहे. त्यांना त्यांचं राजकारण लखलाभ. मला यावर कुठलीही राजकीय प्रतिक्रिया द्यायची नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मस्साजोगचे सामूहिक जलसमाधी आंदोलन

मस्साजोग ग्रामस्त उद्या सामूहिक जल समाधी आंदोलन करणार आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग ग्रामस्थ सामूहिक जल समाधी आंदोलन करणार आहेत. इतर तीन आरोपी अजून मोकाट आहेत. त्यांना अटक करण्याची मागणी आता लावून धरण्यात आली आहे. मस्साजोग ग्रामस्थांनी केज तहसीलदारांना या आंदोलनाविषयीचे निवेदन दिले आहे. मस्साजोग शिवारात ग्रामस्थ सामूहिक जल समाधी आंदोलन करणार आहेत.

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.