AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Live : केजमध्ये मोठ्या घडामोडी, वाल्मिक कराडचे दोन वकील कोर्टात, शहरात तणावपूर्ण शांतता

वाल्मिक कराड याच्या रिमांडवर केज कोर्टात सुनावणी सुरु होण्याआधी त्याची वैद्यकीय चाचणी पार पडली. त्यानंतर त्याला केज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर केज कोर्ट परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.

Beed Live : केजमध्ये मोठ्या घडामोडी, वाल्मिक कराडचे दोन वकील कोर्टात, शहरात तणावपूर्ण शांतता
केजमध्ये मोठ्या घडामोडी, वाल्मिक कराडचे दोन वकील कोर्टात
| Updated on: Dec 31, 2024 | 10:29 PM
Share

बीड जिल्ह्यातील केज शहरात सध्याच्या घडीला मोठ्या घडामोडी घडत आहेत. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला आज केज कोर्टात हजर करण्यात आलं. वाल्मिक कराडने आज सीआयडीच्या पुणे येथील कार्यालयात स्वत:ला सरेंडर केलं होतं. त्यानंतर सीआयडी पथक वाल्मिक कराडला घेऊन बीडच्या दिशेला रवाना झालं होतं. वाल्मिक कराडच्या रिमांडवर रात्री उशिरा सुनावणी व्हावी, अशी विनंती सीआयडीने कोर्टात केली होती. केज कोर्टाने सीआयडीची मागणी मान्य केली. त्यानंतर सीआयडीचे पथक वाल्मिक कराड याला घेऊन आज रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास केज येथे दाखल झाले. केजमध्ये दाखल होताच सीआयडीचे पथक वाल्मिक कराड याला घेऊन केज येथील शासकीय रुग्णालयात गेले. तिथे वाल्मिक कराड याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर वाल्मिक कराड याला केज पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

वाल्मिक कराडचे वकील हरिभाऊ गुठे आणि दूसरे वकील अशोक कवडे हे केज कोर्टात रात्री दहा वाजेआधी हजर झाले. तसेच सीआयडीतर्फे युक्तिवाद करण्यासाठी सरकारी वकील एस. एस. देशपांडे हे देखील केज कोर्टात हजर झाले. तर दुसरीकडे वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला केज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. इथे तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर वाल्मिक कराड याला केज कोर्टात हजर केलं जाईल. यानंतर सुनावणी पार पडेल, अशी माहिती आहे.

सरकारी वकिलाने केस सोडली, दुसऱ्या वकिलाची नियुक्ती

दरम्यान, एक महत्त्वाची घडामोड घडली. सरकारी वकील एस. एस. देशपांडे यांनी कोर्टाकडे पत्र दिलं. वैयक्तिक कारणास्तव या प्रकरणात अन्य वकील नेमावा म्हणून पत्र दिलं. त्यामुळे आता जे बी शिंदे सरकारी वकील म्हणून युक्तिवाद करणार आहेत. आधीचे सरकारी वकील देशपांडे यांनी केस सोडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही बाजूने परस्पर विरोधी कार्यकर्ते

या दरम्यान, केजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही बाजूने परस्पर विरोधी कार्यकर्ते बघायला मिळाले. यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. पण तरीही कार्यकर्त्यांची पोलिसांसमोर घोषणाबाजी केली. नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अशा प्रकारच्या घोषणा कार्यकर्त्यांनी केली. शिवाजी महाराज चौक न्यायालयापासून 500 मीटर अंतरावर आहे.

वाल्मिक कराड याला केज पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाताना केजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतोष देशमुख यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी काही जणांनी केली. नही चलेंगे नही चलेंगे दादागिरी नही चलेंगी, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.