बळ दे पखांना, झाडा-फुला-पानांना, समाजाला अनोखा संदेश देत लेकीचा आगळा वेगळा वाढदिवस, बीडच्या निसर्गप्रेमीचं मोठ्ठं गिफ्ट!

बीडमधल्या निसर्गप्रेमीनं आपल्या लेकीचा, सर्पराज्ञीचा वाढदिवस अगदी वेगळ्या पद्धतीनं साजरा केला. सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे या दाम्पत्याच्या लेकीचा सर्पराज्ञी हिच्या दहाव्या वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन सध्या खूप चर्चेत आहे.

बळ दे पखांना, झाडा-फुला-पानांना, समाजाला अनोखा संदेश देत लेकीचा आगळा वेगळा वाढदिवस, बीडच्या निसर्गप्रेमीचं मोठ्ठं गिफ्ट!
बीडमध्ये सिद्धार्थ सोनवणे यांनी लेकीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला.
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 11:27 AM

बीडः निसर्गावर जीवापल्याड प्रेम करणारा बीडमधील सिद्धार्थ सोनवणे. उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा वृक्षांसहित वन्य प्राण्यांना आपल्या घरातल्या पिला-बाळांप्रमाणं जीव लावत जपणाऱ्या सिद्धार्थचं जग खूप वेगळंय. शिरुर तालुक्यातील तागडगाव इथं तर त्यानं सर्पराज्ञी नावानं वन्यजीवांची हक्काची सृष्टीच जणू वसवलीय. याच सृष्टीत त्यानं नुकताच आपल्या लेकीचा, सर्पराज्ञीचा वाढदिवस अगदी वेगळ्या पद्धतीनं साजरा केला. सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे या दाम्पत्याच्या लेकीचा सर्पराज्ञी हिच्या दहाव्या वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन सध्या खूप चर्चेत आहे.

Beed birthday

80 प्रजातींच्या वृक्षांची तुला

सर्पराज्ञीचा जन्मोत्सव अगदी वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा, असं सोनवणे दाम्पत्यानं ठरवलं. यावेळी 80 प्रजातींच्या वृक्षांची बीजतुला करण्यात आली. यात सामान्यपणे आढळणार्‍या तसेच दुर्मिळ अति दुर्मिळ सोनसावर, कौशी, वायवर्ण, निर्मली, लाल हादगा, कोशिंब, बिबवा, काटेसावर, पांढरा पांगारा, पिवळा पळस, ताम्हण, तांबडा कुडा, आदीवृक्षांचा बियांचा वापर करण्यात आला. वृक्षतुला करून सर्पराज्ञीच्या हस्ते बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. तसेच सोनवणे दाम्पत्यानं उपचार करून बऱ्या केलेल्या वन्यजीवांना पुन्हा आदिवासात सोडण्यात आले. यावेळी सायंकाळी सर्पराज्ञीच्या हस्ते सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचारानंतर पूर्ण बरे झालेल्या व निसर्गात जगण्यास समर्थ असलेले उदमांजर,काळवीट व कोकिळेस निसर्गात सोडून देण्यात आले.

अखंड अविरत वन्यजीव रक्षणाचा वसा

सोनवणे दाम्पत्याने शिरूर तालुक्यातील तागडदाव इथं सर्पराज्ञी वन्यजीवन पुनर्वसन केंद्र स्थापन केलं आहं. जिल्ह्यातील माळरानावर सापडणारे जखमी प्राणी, पक्षी यांच्या सुश्रुषेपासून पुनर्वसनापर्यंत सर्व जबाबदारी हे दाम्पत्य घेते. कमी वृक्षसंपदा असली तरी बीडमध्ये अनेक दुर्मिळ प्रजातीचे वन्यजीव आढळतात. एखादा प्राणी, पक्षी जखमी झाला आणि सानवणे दाम्पत्याकडे त्याची घरच्या माणसाप्रमाणं सुश्रुषा केली जाते आणि बरं झाल्यावर त्याला निसर्गातच मोकळं सोडून दिलं जातं. अशा या निसर्गप्रेमीनं लेकीचा अनोख्या पद्धतीनं साजरा केलेला वाढदिवसही समाजाला संदेश देणारा ठरलाय.

इतर बातम्या-

Video : उंदराऐवजी गम ट्रॅपमध्ये अडकला नाग! जिल्हाधिकाऱ्यांच्या घरातला प्रकार, हेल्पिंग हँड्स टीमनं केली सुटका

सलमान खानचा शेजाऱ्यावर मानहानीचा दावा, मुंबई दिवाणी न्यायालय म्हणाले, ‘आम्ही नकार देतो!’

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.